महाराष्ट्र राज्यातील वृद्ध साहित्यिक व कलावंत यांना मानधन योजना
योजनेची माहिती व अटी
◆अर्जदार किमान १५ वर्षांपासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
◆वृध्द साहित्यिक व कलाकार यांचे वय ५० वर्षापेक्षा जास्त असावे.
◆कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ४८ हजार रुपये पेक्षा जास्त नसावे.
◆जे साहित्यिक व कलावंत अर्धांगवायू, क्षय, कर्करोग, कुष्ठरोग इत्यादी रोगांनी आजारी असतील व ज्यांना ४० टक्के शारीरिक व्यंग किंवा अपघाताने ४० टक्के अपंगत्व आले असेल त्यांना वयाची अट शिथिल केली जाईल.
◆साहित्यिक/कलावंत असल्याबाबत तसेच या क्षेत्रात व १५ ते २० वर्षे इतका प्रदीर्घ काळ कार्य केल्याबाबाबतचे किमान दोन पुरावे सादर करावे लागतील.
◆मानधन रक्कम अदा करण्यापूर्वी हयातीचा दाखला सादर करणे आवश्यक.
◆शासनाच्या अन्य कोणत्याही योजनेखाली नियमित मासिक आर्थिक लाभ घेणारी व्यक्ती या योजनेखाली लाभ घेण्यास पात्र राहणार नाही.
◆मानधन मिळणाऱ्या लाभार्थ्यांचे निधन झाल्यास त्याच्या पत्नी किंवा पतीस तहहयात मानधन देण्यात येते. वारसदाराला दिवंगत लाभार्थ्यांचे मृत्यूचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल.
◆साहित्यिक व कलावंत यांना मानधनासाठी पात्र ठरवण्याचा अंतिम निर्णय जिल्हास्तरीय निवड समितीचा असेल.
योजनेअंतर्गत लाभ
अ वर्ग - वार्षिक मानधनाची रक्कम १६ हजार ८०० किंवा १ हजार ४०० रुपये प्रतिमाह.
ब वर्ग - वार्षिक मानधनाची रक्कम १४ हजार ४०० किंवा १ हजार २०० रुपये प्रतिमाह.
क वर्ग - वार्षिक मानधनाची रक्कम १२ हजार किंवा १ हजार रुपये प्रतिमाह.
अधिक माहितीसाठी : संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, समाज कल्याण अधिकारी, विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा