किल्ले बनविण्यासाठी बच्चेकंपनीची लगबग सुरू....पण पाऊस झाला तर...?...हीपण भीती...!!
फोटो ओळ : करंजे गावातील किल्ले बनवताना मुले.
सोमेश्वरनगर - सर्वत्रच दिवाळीनिमित्त शाळकरी मुलांना सुट्टी लागली असून, सध्या बच्चेकंपनीला किल्ले बनविण्याचे वेध लागले आहेत.ना त्यांना नवीन कपडे ग्यायची हाऊस ना फटाकड्यांची फक्त आपला किल्ला कसा आकर्षक दिसेल यामध्येच मुले व्यस्त असल्याचे दिसत आहे तर त्या चिमुकल्या हाताने एकावर एक विटा, दगड लावत, त्यावर मातीचा लेप चढविण्यास सुरुवात झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील चर्चेत असणाऱ्या गड किल्ले गड, किल्ले बनविण्याकडे बच्चे कंपनीचा कल आहे. लहान मुलांना सहकार्य करण्यासाठी कुटुंबातील लहान थोरांसह तरुण मुले सुद्धा सहकार्य करत आहे बारामती तालुक्यातील सोमेश्वर नगर परिसरात चौधरवाडी, करंजे ,देवळवाडी, रासकरमळा , माळवाडी जोशी वाडी,करंजेपूल ,वाणेवाडी ,वाघळवाडी ,निंबूत सोरटेवाडी परिसरात किल्ले बनविण्यासाठी लगबग सुरू आहे. दगड-मातीचा ढिगारा, रंग, विटा, झेंडे, महाराज आणि मावळ्यांच्या प्रतिकृती यांचा वापर करून सौम्य तसेच रौद्र स्वरूपाचे किल्ले बनवायला सुरुवात झाली आहे. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार शहरी भागात तुरळक ठिकाणी किल्ले बनविले जात आहेत. कारण टॉवर आणि बिल्डिंग संस्कृती वाढली आहे. जागेचा अभाव असल्याने किल्ले बनविण्याची प्रथा कमी होत आहे. डिजिटल युगामुळे सर्वमंडळी मोबाइलवर दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात व्यस्त झाले आहेत. शिलाहार काळापासून किल्ल्यांना महत्त्व प्राप्त झाले. त्यानंतर, मराठ्यांचे शौर्याचे प्रतीक म्हणून किल्ल्यांकडे पाहिले गेले. त्यामुळे किल्लांचे महत्त्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात वाढले. हाच इतिहास आठवण्यासाठी आणि लहान मुलांना तो समजून घेण्यासाठी किल्ले बनविणे आवश्यक आहे, असे सोमेश्वरनगर परिसरातील दरवर्षी किल्ले स्पर्धा बनवणाऱ्या मंडळांनी सांगितले .प्रतापगड, रायगड, माहुली, सिंहगड, पन्हाळा गड, मुरुड जंजिरा किल्ला, कुलाबा किल्ला या किल्ल्यांची प्रतिकृती बनविण्यात येते. किल्ले बनविल्याने किल्लांचा अभ्यास, यांचे रूप, पराक्रम यांची माहिती मिळते असेही त्यांनी बोलताना सांगितले.