सोमेश्वरनगर ! परतीच्या पावसाची थोडी उघडीप...बाजरी सुकविण्यासाठी शेतक-यांची लगबग
सोमेश्वरनगर - परतीच्या पावसाने दोन दिवसांची उघडीप दिल्यानंतर शेतक-यांनी बाजरी कापणी करुन ती सुकविण्यासाठी लगबग सुरु झाली आहे.जिल्हा सह बारामती तालुक्यात सलग चार दिवस परतीच्या पावसामुळे अगोदरच
बाजरी कापणीला उशीर झालेला होता. मात्र
काही
दोन दिवसांपासून थोड्या फार प्रमाणात कडक ऊन पडत तर वातावरणात बदल
असल्याने आणि पुन्हा पावसाचा अंदाज
असल्यामुळे शेतक-यांची कणस सुकवण्याच्या
कामाची तयारी सुरु असल्याच सध्या सोमेश्वरनगर भागातील करंजे,मगरवाडी, देऊळवाडी, सोरटेवाडी,शेंडकरवाडी, वाघळवाडी ,करंजेपुल सह आजूबाजूच्या ग्रामीण भागात
पहावयास मिळत आहे. अगोदरच परतीच्या पावसामुळे बाजरीला फटका बसून उत्पादन कमी येणार आहे. त्यामुळे पुन्हा पावसामुळे पीक खराब होऊ नये बाकीच्या शेतकऱ्यांनबरोबर याची लगबग वाघळवाडीतील (ता बारामती)हिंदूराव सकुंडे कुटूंबाची सुरु आहे.