शिवसंपर्क अभियान अंतर्गत बारामती तालुक्यात गाव भेट दौरा
सोमेश्वरनगर - शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे साहेब यांच्या आदेशानूसार शिवसंपर्क अभियान अंतर्गत बारामती तालुक्यातील गाव भेट दौरादरम्यान बारामती शिवसेना विधान सभा संपर्क प्रमुख विलास भुजबळ यांनी शिवसेना कार्यालय करंजे येथे शनिवार दि .२९ रोजी भेट दिली.यावेळी माझ्या विभागांतील उपतालुका प्रमुख मंगेश खताळ युवा सेना जिल्हा सरचिटणीस, परेश भापकर ,करंजेगाव शाखा प्रमूख नागेश गायकवाड व युवा नेतृत्व रंजीत हुंबरे उपस्थित होते.यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला.