माजी सैनिकांच्या पाल्यांना आर्थिक सहाय्य योजना
योजनेचा उद्देश: राज्यातील मान्यता प्राप्त व अनुदानित शैक्षणिक संस्थेत पदवी व पदव्युत्तर स्तरावर शिक्षण घेणाऱ्या माजी सैनिकांच्या पाल्यांना शैक्षणिक सवलत.
योजनेच्या अटी व शर्ती:
• महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र धारण करणाऱ्या किंवा महाराष्ट्रात भरती झालेल्या मेजर, नौदल किंवा वायू दलातील तत्सम दर्जाच्या हुद्यापर्यंत (वा त्यापेक्षा कमी दर्जाच्या हुद्यावरुन) सेवानिवृत्त झालेल्या माजी सैनिकांची मुले/मुली/पत्नी/विधवा यांना या योजनेखाली शैक्षणिक सवलती देय.
• वार्षिक परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यास अथवा वरच्या वर्गात पदोन्नत न झाल्यास या सवलती स्थगीत ठेवण्यात येतील. मात्र त्यानंतर विद्यार्थी वरच्या वर्गात पदोन्नत झाला की त्यास ही सवलत पुढे चालू ठेवण्यात येईल.
• या सवलतीचा लाभ घेणाऱ्या व्यक्तीस अन्य दुसऱ्या योजनेखाली शुल्क माफी, पुस्तक अनुदान, गणवेश अनुदान आदी सवलतीचा लाभ घेता येणार नाही.
• एकाच वेळी एका विद्यार्थ्याला एका पेक्षा जास्त अभ्यासक्रमांना या सवलतीचा लाभ दिला जाणार नाही.
• शासकीय, अनुदानित महाविद्यालयांमधील अभ्यासक्रमास प्रवेश घेणारे विद्यार्थीच अर्ज करण्यास पात्र आहेत.
• महाराष्ट्राबाहेर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला या योजनेसाठी अर्ज करता येणार नाही.
• या सवलती समाधानकारक प्रगती, चांगली वर्तवणूक व नियमित उपस्थिती असल्यास विहित अभ्यासक्रम संपेपर्यंत चालू राहतील.
आवश्यक कागदपत्रे:
• सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले अधिवास प्रमाणपत्र.
• डी.एस.एस.ए. किंवा सी.एस.एस.ए. मंडळाचे महाराष्ट्र राज्याचे अधिकार पत्र धारण करीत असल्याचे किंवा महाराष्ट्रात भरती झाल्याचे तसेच मेजर व नौदल आणि वायुदलातील तत्सम दर्जाच्या हुद्दापर्यंत (वा त्यापेक्षा कमी हुद्दावरुन) निवृत्त माजी सैनिक असल्याचे प्रमाणपत्र.
• मागील वर्षांची गुणपत्रिका.
लाभाचे स्वरूप : प्रवेश शुल्क, सत्र शुल्क, ग्रंथालय शुल्क, प्रयोगशाळा शुल्क १०० टक्के देण्यात येते. लाभार्थी विद्यार्थ्याच्या शिक्षण शुल्काची रक्कम महाविद्यालयांकडून आकारली जात नाही.
अर्ज करण्याची पद्धत: नवीन मंजुरी व नूतनीकरणासाठी ऑनलाईनरित्या
https://mahadbtmahait.gov.in
या संकेतस्थळावर अर्ज करणे आवश्यक. नूतनीकरणासाठी मागील वर्षीच्या अर्ज ओळख क्रमांकाचा उपयोग करणे आवश्यक.
संपर्क: शिक्षण संचालक, उच्च शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे