बारामती ! एकात्मिक फलोत्पदान विकास अभियानांतर्गत शेतकऱ्यांसाठी मनुष्यबळ विकास प्रक्षेत्र प्रशिक्षणाचे आयोजन - वैभव तांबे
बारामती : कृषि उपविभाग बारामती यांच्या वतीने एकात्मिक फलोत्पदान विकास अभियान सन २०२२-२३ अंतर्गत शेतक-यांसाठी मनुष्यबळ विकास प्रक्षेत्र प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती उपविभागीय कृषि अधिकारी वैभव तांबे यांनी दिली आहे.
कृषि विज्ञान केंद्र बारामती, नारायणगाव, राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था, माळेगाव, महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी, उपविभाग कळवण, जि. नासिक, राष्ट्रीय सुगीपश्चात तंत्रज्ञान संस्था व फलोत्पादन प्रशिक्षण केंद्र, तळेगाव दाभाडे जि. पुणे व डाळिंब संशोधन केंद्र, गणेशखिंड जि.पुणे या ठिकाणी शेतकऱ्यांना प्रक्षेत्र प्रशिक्षणासाठी पाठवण्यात येणार आहे.
या प्रशिक्षणात फळबाग, भाजीपाला, फुलशेती, तंत्रज्ञान, फळबाग व्यवस्थापन, काटेकोर शेती व्यवस्थापन, कांदाचाळा, संरक्षित शेती, एकात्मिक किड रोग, अन्नद्रव्य व्यवस्थापन, काढणीपश्च्यात व्यवस्थापन, प्राथमिक प्रक्रिया केंद्र व निर्यातक्षम उत्पादन या विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार असून कृषि पर्यटन व प्रगतशील शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्रावर भेटीचे देखील नियोजन करण्यात येणार आहे.
बारामती, इंदापुर, दौंड व पुरंदर या तालुक्यातील
जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषि अधिकारी यांच्याकडे ११ नोव्हेंबर पर्यंत अर्ज करून या प्रशिक्षणासाठी सहभाग नोंदवावा, असे आवाहन श्री. तांबे यांनी केले आहे.