दाैंड तालुक्यातील शेतकरी पंचनामा व नुकसान भरपाई पासून वंचित
दाैंड - दाैंड तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकरी पंचनाम्याच्या प्रतिक्षेत
दाैंड तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने शेतक-यांचे माेठया प्रमाणावर शेती पिकांसह जनावरांचे गाेठे व राहत्या घरांचे माेठे नुकसान झालेले असून शेतकरी शासकीय नुकसान भरपाईच्या प्रतिक्षेत आहे.राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासकीय यंत्रणेला दिपावली पूर्वीच शेतक-यांच्या नुकसानीचे पंचनामे करून त्यांना नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले असतानाही शासकीय यंत्रणेचे अधिकारी व कर्मचारी शेतक-यांच्या शेतापर्यंत पाेहचलेले नाहीत.तसेच अधिकारी पदाधिकारी शेतक-यांना अरेरावीची भाषा वापरुन त्यांना अवमानीत करताना दिसत असल्याची चर्चा दाैंड तालुक्यातील शेतकरी वर्गातून पुढे आली आहे.अधिकारी व पदाधिकारी बाेगस पंचनामे करुन ज्यांचे खराेखरच नुकसान झाले आहे अशा शेतक-यांचे पंचनामे करण्याचे टाळले जात असल्याचे आलेगाव कदमवस्ती येथील शेतकरी राजेंद्र गुणवरे व भाऊ घुले यांनी सांगितले अाहे.गुणवरे व घुले कुटुंबांचे शेतातील बाजरी,कांदा,ऊस,मिरची पिकांमध्ये आज ही पाणी साठलेले असतानाही त्यांना दाैंड तालुका कृषी विभागाच्या पदाधिका-यांनी अरेरावीची भाषा वापरुन त्यांना म्हणाले की तुमचे काहीच नुकसान झाले नाही.आम्ही तुमचा पंचनामा करणार नाही. मात्र याची सर्वत्र चर्चा झाल्यानंतर तिस-या दिवशी पदाधिका-यांना जाग आली.
एकंदरीत शेतकरी माेठया संकटात सापडलेला असतानाही महसूल व कृषी विभागाच्या कामचुकारपणामुळे शेतकरी उध्वस्त हाेण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.शासनाने वरील बाबीची गांभीर्याने दखल घेऊन शेतक-यांना सर्रास नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी वर्गातून पुढे आली आहे.