नवरात्रोत्सव निमित्त चौधरवाडी येथील भवानी माता देवी ला नऊ विविध साड्याचा वस्त्रालंकार ; विजयादशमी(दसरा) मोठ्या उत्साहात साजरा.
भवानी माता (घाटशिळा आई) देवी चौधरवाडी
सोमेश्वरनगर - बारामतीतील चौधरवाडी येथे असणारे जागृती स्थान म्हणून घाटशिळा आई प्रसिद्ध तुळजा भवानी मंदिर डोंगरावर वसलेले आहे. दरवर्षी नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात दहा दिवस चौधरवाडी ग्रामस्थ करत असतात . चौधरवाडी नजीक डोंगरावर भवानी माता मंदिर हे नवरात्र उत्सवानिमित्त केलेली विद्युत रोषणाई केलेली होती .डोंगरावर विविध झाडांचे वृक्षारोपण केल्याने देवीचा डोंगर हिरवागार दिसत आहे. दररोज मंदिर गाभाऱ्यात विविध फुलांनी आकर्षक सजावट केल्याने गाभा-याला फुल बागेचे स्वरूप प्राप्त झाले. तसेच दररोज म्हणजे नऊ दिवस देवीला रोजच्या रंगानुसार विविध रंगांच्या वस्त्रालंकार करण्यात आली होती, त्यामुळे भक्त भाविकांना देवीचे विविध रूपांचे दर्शन घडले.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त चौधरवाडी गावातील ज्यांना 75 वर्ष पूर्ण झाल्याने आरती मान दिला ..या आरती प्रसंगी चौधरवाडी येथील मान्यवर ग्रामस्थ तसेच संबळ वादक व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहत होता...
चौधरवाडी येथील भवानी माता मंदिर येथे नवरात्रोत्सव निमित्त विविध जिल्ह्यातून देवीभक्त भाविक आवर्जून दर्शनासाठी येत त्यामुळे देवीच्या डोंगर परिसरात रोजच यात्रेचे स्वरूप प्राप्त होते.