कौतुकास्पद ! स्वच्छ सर्वेक्षण २०२२ मध्ये बारामती नगरपरिषद देशात नववी
बारामती - स्वच्छ सर्वेक्षण २०२२ मध्ये बारामती नगरपरिषदेला देशात नववा तर महाराष्ट्रात दुसरा क्रमांक मिळाला आहे. तसेच १ ते ३ लाख लोकसंख्या असलेल्या छोट्या शहरांमध्ये वेगाने कामगिरी करणारे शहर म्हणून पुरस्कार मिळवला आहे. बारामती शहराने स्टार वन आणि वॉटर प्लस मानांकन मिळवून चमकदार कामगिरी केली आहे. बारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.