बारामती ! निराधार योजनेच्या ६ हजार ६४१ लाभार्थ्यांना २ कोटी १८ लाख रुपयांचे अनुदान वाटप.
बारामती : संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत बारामती तालुक्यातील ६ हजार ६४१ लाभार्थ्यांचे जुलै ते ऑक्टोबर २०२२ या चार महिन्यांचे २ कोटी १८ लाख ६ हजार ४०० रुपयांचे अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहे, अशी माहिती तहसिलदार विजय पाटील यांनी दिली आहे.
संजय गांधी निराधार योजनेतील सर्वसाधारण प्रवर्गातील २ हजार ८३४ लाभार्थ्यांचे ९६ लाख ९६ हजार ४००, त्याच योजनेतील अनुसुचित जाती प्रवर्गातील ५७९ लाभार्थ्यांचे २० लाख ७ हजार ९००, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील सर्वसाधारण प्रवर्गातील २ हजार ६४४ लाभार्थ्यांचे ८४ लाख १५ हजार ४०० व त्याच योजनेतील अनुसूचित जाती प्रर्वर्गातील ५८४ लाभार्थ्यांतचे १६ लाख ८६ हजार ७०० असे एकूण २ कोटी १८ लाख ६ हजार ४०० रुपयांचे अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहे.
ज्या लाभार्थ्यांनी अद्यापही उत्पन्नाचा दाखला जमा केला नाही त्यांनी लवकरात लवकर दाखला जमा करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही
श्री. पाटील यांनी केले आहे.