आघारकर संशोधन संस्था होळ (८ फाटा), सोरटेवाडी येथे खपली गहू पैदासकार बियाणे विक्रीसाठी उपलब्ध.
सुधारित खपली वाण एम.ए.सी.एस. २९७१ (MACS 2971) आघारकर संशोधन संस्थेने २००९ साली हा खपली बुटका वाण व अधिक उत्पन्न देणारावाण प्रसारीत केला आहे.
या जातीच्या लागवडीची शिफारस महाराष्ट्र, कर्नाटक या भागासाठी वेळेवर पेरणीसाठी
वाणाची उंची ८५ ते ९० सेंमी. कालावधी १०६ दिवस आहे. हा वाण तांबेरा प्रतिकारक असून दाणा तांबडा लांबट आहे. प्रथिनांचे प्रमाण अधिक. गावरान खपली पेक्षा अधिक उत्पन्न व उंचीला बुटका, लोळत नाही. उत्पन्न क्षमता ४५ ते ५० क्विं/हे.बियाणे मिळण्याचे ठिकाण:
अखिल भारतीय समन्वित गहू संशोधन प्रकल्प,
प्रायोगिक कृषी प्रक्षेत्र, आघारकर संशोधन संस्था (महाराष्ट्र विज्ञान वर्धिनी) होळ (८ फाटा), सोरटेवाडी, तालुका - बारामती, जिल्हा-पुणे
संपर्क: सकाळी ९ ते सायंकाळी ५.३० पर्यंत
डॉ. यशवंत कुमार, गहू पैदासकार
९९७२८४२६१० डॉ. अजित चव्हाण, वैज्ञानिक / प्रभारी ९४२३००७२३८ डॉ. विजेंद्र बाविस्कर, गहू कृषी विद्यावेत्ता ८३७४१७४७९७
श्री. विठ्ठल गिते, तांत्रिक अधिकारी ९४०४२१४९१२ MACS 2971
खपली दाना भरडल्यानंतर (खाण्यासाठी)
MACS 29712 खपली टरफलासाहित
(पेरणीसाठी )