मोरगाव चौकातून निरेकडे जाणाऱ्या वाहनांना परवानगी नाही ; निरा येथील बुवासाहेब ओढ्याच्या पुलावरून वाहत आहे पाणी.
सोमेश्वरनगर - अष्टविनायक मोरगाव (ता. बारामती) येथून निरा दिशेने जाणारी वाहने मोरगाव येथील मुख्य चौकातून बंद करण्यात आली आहे.परतीच्या पावसाचे प्रमाण प्रमाण जास्त असल्याने व निरा( ता पुरंदर) येथील बुवासाहेब वाड्याला पाणी पुलावरून चालले असल्याने नीरा सोमेश्वर ,गुळूंचे,सोमेश्वर संपर्क तुटलेला आहे, सोमेश्वर हे मोठे शिक्षण संकुलन आहे निराभाखातून येथे शिक्षणासाठी येत असतात तेही आज बुवासाहेब वड्याला पुलावरून पाणी असल्याने येऊ शकले नाही त्यामुळे वाहनांना जाण्यास परवानगी नाही अशी माहिती सुपा दुरक्षेत्र चे पोलीस निरीक्षक शेखसाहेब यांनी दिली आहे.