श्री सोमेश्वर सह.साखर कारखान्याच्या ६१ व्या गळीत हंगामाचा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या शुभ हस्ते प्रारंभ.
सोमेश्वरनगर बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या ६१ व्या गळीत हंगामाचा प्रारंभ रविवार दि ९ रोजी विरोधी पक्षनेते महाराष्ट्र राज्य अजित पवार यांच्या शुभ हस्ते झाला.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री दत्तात्रय भरणे कारखाना अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप उपाध्यक्ष आनंदराव होळकर कार्यकारी संचालक राजेंद्र यादव सह सर्व विद्यमान संचालक मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी आयोजित सोमेश्वर कारखाना सभागृह येथे शेतकरी मेळाव्यात आयोजित केला होता. व्यासपीठावर अध्यक्षस्थानी माजी मंत्री दत्तात्रेय भरणे होते.तर प्रमुख उपस्थितीत आमदार संजय जगताप, पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे, छत्रपतीचे अध्यक्ष प्रशांत काटे, सोमेश्वरचे माजी अध्यक्ष शहाजी काकडे, राजवर्धन शिंदे, प्रमोद काकडे, संभाजी होळकर, माणिक झेंडे, दत्तात्रय येळे, सतीश खोमणे, कौस्तुभ चव्हाण, विक्रम भोसले सह विद्यमान संचालक मंडळ उपस्थित होते,
आमदार संजय जगताप, सोमेश्वरचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांची भाषणे झाली. कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष आनंदकुमार होळकर यांनी आभार मानले.