वाकी-चोपडज येथे वन्यजीव संरक्षण या विषयी जनजागृतीपर पथनाट्य आयोजन.
सोमेश्वरनगर - वन्यजीव साप्ताहानिमित पुणे वनविभागांतर्गत वनपरिक्षेत्र - बारामती मध्ये वनविभाग, बारामतीतील न्यू इंग्लिश स्कूल वाकी - चोपडज येथे १ ते ७ ऑक्टोबर वन्यजीव सप्ताह-२०२२ निमित्त पथनाट्य करून जनजागृती केली. सदर कार्यक्रम मा.मुख्यवनसंरक्षक एन. आर. प्रविण सो. व मा. उपवनसंरक्षक पुणे राहुल पाटील सो. व मा. सहाय्यक वनसंरक्षक मयुर बोठे सो. व वनपरिक्षेत्र अधिकारी बारामती शुभांगी लोणकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला.
यावेळी पी. डी चौधर वनपाल करंजे, योगेश कोकाटे वनरक्षक करंजे ,कर्मचारी नंदकुमार गायकवाड व इतर कर्मचारी विद्यार्थी मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.