महाराष्ट्रात आम आदमी पार्टी इतिहास घडविणार- मुकुंद किर्दत
दाैंड तालुक्यात आम आदमी पार्टीला उस्फुर्त प्रतिसाद
दाैंड - दाैंड येथील आम आदमी पार्टीच्या संपर्क कार्यालयाच्या उदघाटन कार्यक्रम प्रसंगी पुणे जिल्ह्याचे संयाेजक मुकुंद किर्दत बाेलत हाेते.ते म्हणाले की आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्या कणखर व अभ्यासू नेतृत्वामुळे दिल्ली व पंजाब मध्ये सत्ता काबीज केल्यानंतर आता महाराष्ट्र राज्यातील ग्रामपंचायत,पंचायत समिती,जिल्हापरिषद,आमदार,खासदाकीच्या निवडणूकांची पुर्ण तयारी झाली आहे. सर्व सामान्य जनतेला काम करणा-या नेतृत्वीची गरज असल्याने आम आदमी पार्टीने उमेदवारांच्या चाचपणीला सुरुवात केली आहे.आपल्याला खाेक्यावाले नकाे तर आेकेवाले पाहिजेत.
दाैंड तालुक्यात आम आदमी पार्टीचे काम चांगले आहे.म्हणून लाेकांचा प्रतिसाद चांगला मिळत आहे.त्यामुळे दाैंड तालुक्यातील प्रस्थापितांच्या पायाखालची वाळू सरकायला लागली असल्याचे शेवटी मुकुंद किर्दत म्हणाले.या वेळी रविंद्र जाधव,शुभांगी धायगुडे,मीना जाेसेफ विक्रम साबळे,शाम महामुनी,तुषार जाधव,विनायक गवळी,संताेष शिदगणे,दाैंड,श्रीगाेंदा तालुक्यातील आपचे कार्यकर्ते माेठया संखेने उपस्थित हाेते.