बारामती ! पिंपळीत दिपावली निमित्त राजस्थान महावस्त्रदालनच्या वतीने बचतगटातील महिलांना कापड खरेदी कुपन वाटप
बारामती - पिंपळी ग्रामपंचायतीच्या सदस्या अश्विनी सुनिल बनसोडे यांच्या प्रयत्नातून पिंपळी-लिमटेक गावातील बचतगटातील सर्व गरजू महिलांना बारामतीतील दर्जेदार कापड खरेदीसाठी प्रसिद्ध असलेले राजस्थान महावस्त्रदालन, वॉर्ल्डरुब,द्वारकदास शामकुमार या कापड दुकानाचे कुपन कापड व्यवसाय समूहाचे चेअरमन सुभाष सोमाणी यांचे माध्यमातून वाटप करण्यात आली.
सर्व कुपन धारक महिलांना पाच ते दहा हजार रुपयांपर्यंत लहान ते मोठया व्यक्तींच्या कपड्यांची खरेदी करता येणार आहे. कापड खरेदी स्कीम योजनेची परतफेड सुलभ हप्त्याने डिसेंबर महिन्यापासून करता येणार आहे. कोरोनाकाळातून सावरलेल्या कुटुंबांना दिपावली साजरी करणे शक्य नव्हते त्या कुटुंबाना मोठा दिलासा मिळाल्याने बचतगटातील सर्व महिलांनी समाधान व्यक्त करून बचतगट गाव जनसमुदाय समन्वयक व ग्रामपंचायत सदस्या अश्विनी बनसोडे व राजस्थान महावस्त्रदालन उद्योग समूहाचे आभार मानले.
ग्रामपंचायत सदस्या अश्विनी बनसोडे ह्या बचतगटासाठी करत असलेले कार्य व त्यांचे सामाजिक काम स्तुत्य व कौतुकास्पद असल्याचे सांगून सर्व गरजू कुटुंबाची दिपावली आनंदमय होत असल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला.
कुपन मिळणेकामी बाळासो बनसोडे यांचे सहकार्य लाभले.
यावेळी संचालक संतोषराव ढवाण पाटील, सरपंच मंगल केसकर, बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मिडियाचे अध्यक्ष सुनिल बनसोडे, हरिभाऊ केसकर, लालासो टेंबरे,अनिल बनकर, बाळासो बनसोडे आदिंसह बचतगटातील महिला उपस्थित होत्या.