Type Here to Get Search Results !

बारामती ! सावित्री महिला प्रशिक्षण संस्था पिंपळी आयोजित रक्त तपासणी.शिबिरास नागरिकांचा मोठा प्रतिसाद

बारामती ! सावित्री महिला प्रशिक्षण संस्था पिंपळी आयोजित रक्त तपासणी.

शिबिरास नागरिकांचा मोठा प्रतिसाद
बारामती: सावित्री महिला प्रशिक्षण संस्था पिंपळीच्या वतीने व प्रिशा पॅथलॅब आणि वेद नेचर क्युअर सेंटर माध्यमातून स्वस्त दरात रक्त तपासणी शिबीराचे आयोजन पिंपळी ग्रामपंचायत प्रांगणात करण्यात आले होते.याशिबीरामध्ये रक्ताची साखरेची तपासणी, लिव्हर,किडनी संपूर्ण रक्त तपासणी,लोह तपासणी थायरॉईड, कोलेस्ट्रॉल तसेच वजन,उंची, बीपी, शरीर द्रव्यमान आदींची मोजणी मोफत करण्यात आली.
स्वागत सरपंच मंगल हरिभाऊ केसकर यांनी केले व प्रास्ताविक ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब भोईटे यांनी केले.
शिबीराचा प्रारंभ सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आला. वेद नेचर क्युअर सेंटर डॉक्टर तानाजी साळवे यांनी अनुवांशिक मधुमेह, भारतातील वाढत्या मधुमेहाची कारणे व त्यावरील उपाय, कोलेस्ट्रॉल तसेच रक्ताच्या विविध तपासणींची माहिती दिली.
याशिबिरात पंचावन्न नागरिकांची तपासणी करण्यात आली.
शिबिराच्या आयोजनाबद्दल आजारग्रस्त नागरिकांनी समाधान व्यक्त केले. प्रायव्हेट लॅब मध्ये याच तपासणींसाठी भरमसाठ पैसे आकारले जातात. परंतु सावित्री प्रशिक्षण संस्थेच्या अध्यक्षा स्नेहा अविनाश थोरात यांच्या मार्फत त्याच तपासण्या अत्यंत अल्प दरात करण्यात तसेच काही मोफत करण्यात आल्या त्याबद्दल संस्थेच्या पदाधिकारी तसेच प्रिशा पॅथलॅब आणि वेद नेचर क्युअर सेंटरचे नागरिकांनी विशेष आभार मानून कौतुक केले.
   सावित्री महिला प्रशिक्षण संस्थेचे कार्य कौतुकास्पद व स्तुत्य असल्याचे मनोगत उपसरपंच आबासाहेब देवकाते-पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
नागरिकांचा सामाजिक उपक्रमांसाठी मिळत असलेला प्रतिसाद हा उत्साह वाढविणारा असून संस्थेच्या वतीने आणखी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातील असे मनोगत अध्यक्षा स्नेहा थोरात यांनी व्यक्त केले.
यावेळी सरपंच मंगल हरिभाऊ केसकर, उपसरपंच आबासाहेब देवकाते पाटील, बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मिडियाचे अध्यक्ष सुनिल बनसोडे, ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब भोईटे, पिंपळी आरोग्य उपकेंद्राचे आरोग्य सेवक राहुल घुले, सावित्री प्रशिक्षण संस्थेच्या अध्यक्षा स्नेहा थोरात, वेद नेचर क्युअर सेंटरचे डॉ.तानाजी साळवे, डॉ.पल्लवी साळवे,प्रिशा पॅथ लॅबचे डॉ.सतीश भोसले,सावित्री प्रशिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षा पूनम थोरात, सदस्या मानिनी थोरात, ग्रामपंचायत शिपाई बाळासाहेब बनसोडे, महादेव खोमणे,सतीश शिंदे,सोपान थोरात तसेच सामाजिक कार्यकर्ते हरिभाऊ केसकर, लालासो टेंबरे,पिंपळी गाव सोशल मिडिया अध्यक्ष दत्तात्रय तांबे, विष्णू धोत्रे,प्रमोद बनकर,बेगम इनामदार,कौशल्या थोरात,पूजा थोरात, पवित्रा चव्हाण, आदींसह तपासनीस आलेले मुले व नागरिक उपस्थित होते.
उपस्थित सर्वांचे आभार तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मिडियाचे अध्यक्ष सुनिल बनसोडे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test