करंजेत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा ६६ वा महापरिनिर्वाण दिन साजरा
सोमेश्वरनगर - राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनी करंजे(ता बारामती) येथे प्रमुख पाहुण्याच्या हस्ते पुष्पहार अर्पण करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.
यावेळी सरपंच जया गायकवाड ,वडगाव निंबाळकर पोलीस सह.निरीक्षक सोमनाथ लांडे,पत्रकार विनोद गोलांडे यांनी पुष्पहार अर्पण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले तसेच करंजे जिल्हा प्राथमिक शाळा विद्यार्थी यांना पेन चे वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते केले
यावेळी भिमरत्न बौद्ध युवक संस्थेचे अध्यक्ष दाजीराम साळवे, शिवसेना विभाग प्रमुख बंटी गायकवाड ,ग्रामपंचायत सदस्य अतुल गायकवाड, करंजे राष्ट्रवादी अध्यक्ष संतोष हुंबरे ,डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीचे अध्यक्ष वीरसेन हुंबरे, सचिव दत्तात्रय गायकवाड, खजिनदार पांडुरंग हुंबरे ,प्रतिभाताई हुंबरे चारिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश हुंबरे, सामाजिक कार्यकर्ते अनिल हुंबरे ,बापू साळवे, महावितरणचे अधिकारी गरजे साहेब , बौद्धाचार्य सुधीर साळवे ,प्राथमिक शाळेचे शिक्षक दिलीप बालगुडे गुरुजी, भारती गायकवाड , मंगल गरुड व ग्रामस्थ व नागरिक समाज बांधव उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस पाटील राजेश सोनवणे यांनी केले तर उपस्थितांचे आभार सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब हुंबरे यांनी मानले.