बारामती ! डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त प्रशासनाकडून अभिवादन
बारामती - डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त उप विभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे  यांनी आज तहसिल कार्यालयामध्ये  डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. 
यावेळी तहसिलदार विजय पाटील, निवासी नायब तहसिलदार विलास करे, निवडणूक नायब तहसिलदार प्रतिभा शिंदे, नायब तहसिलदार डॉ. भक्ती सरवदे- देवकाते यांच्यासह तहसिल कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. 


  

