बारामती ! बारामती येथे जिल्हास्तरीय टेनीकॉईट स्पर्धा संपन्न
बारामती : क्रीडा विभागाच्यावतीने तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती येथे जिल्हास्तरीय टेनीकॉईट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील विविध शाळांमधील १४, १७, व १९ वयोगटातील मुले व मुली मिळून ३७ संघांनी सहभाग नोंदवला.
स्पर्धेचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता उदयसिंह नांदखिले आणि तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रशेखर मुरुमकर यांनी केले.
यावेळी तालुका क्रीडा अधिकारी अनिल सातव, डॉ.गौतम जाधव, महाराष्ट्र टेनीकॉईट असोसिएशनचे सचिव अनिल वरपे, क्रीडा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र खोमणे उपस्थित होते. पंच म्हणून हर्षदा निगडे, साक्षी गोपाळे, आदित्य मेस्त्री यांनी काम पाहिले.
स्पर्धेत विजयी झालेल्या संघांची नावे - *मुले* *१४ वर्ष वयोगट*- विद्याप्रतिष्ठान विनोदकुमार गुजर बालविकास मंदिर बारामती,
*१७ वर्षे वयोगट*-भैरवनाथ विद्यालय, वाखी, ता. खेड, *१९ वर्षे वयोगट*- स्वतंत्र विद्यामंदिर वडगाव निंबाळकर, ता. बारामती.
मुली- १४ वर्ष वयोगट-महात्मा गांधी विद्यालय उरुळी कांचन, ता. हवेली,*१७ वर्ष वयोगट*-महात्मा गांधी विद्यालय, उरुळी कांचन, ता. हवेली, १९ वर्षे वयोगट तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती.