Type Here to Get Search Results !

सोमेश्वर कारखान्याच्या सन २०२२-२३ च्या चुकीच्या FRP, बेकायदेशिर कपाती व तोडणी वाहतुकीच्या गलथान कारभाराच्या चौकशीचे सहकार मंत्रालयाचे आदेश - सतिश काकडे

सोमेश्वर कारखान्याच्या सन २०२२-२३ च्या चुकीच्या FRP, बेकायदेशिर कपाती व तोडणी वाहतुकीच्या गलथान कारभाराच्या चौकशीचे सहकार मंत्रालयाचे आदेश -  सतिश काकडे
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील श्री सोमश्वर सहकारी साखर कारखाना लि. सोमेश्वरनगर या कारखान्याने दि. २/१२/२०२२ रोजी बेकायदेशिर पहिला हप्ता म्हणुन २८००/- रू. प्रति मे. टन जाहिर करून सभासदांच्या बँक खात्यावर वर्ग केला आहे. परंतु केंद्र सरकारच्या २२-२३ च्या दि.१७/८/२०२२
रोजीच्या सुधारीत परिपत्रकानुसार सोमेश्वर कारखान्याची F.R.P २९०४/- रू. प्रति मे. टन बसत
असताना जाणिव पुर्वक दोन हप्ते देण्याच्या हेतुने प्र. मे.टन २८०० /- रू. पहिला हप्ता जाहिर केला
कायद्या प्रमाणे F.R.P चे दोन हप्ते करता येत नसल्याने कारखान्याकडुन वरील सर्व रक्कमेच्या
व्याजाची ही मागणी कृती समितीने केली आहे.
तसेच सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चालु गळीत हंगामाची वाहतुक यंत्रणा चेअरमन
व संचालक मंडळाच्या ढिसार नियोजनामुळे कमी आली आहे. याचा परिणाम उस गाळपावर होवु
लागला असल्यामुळे संचालक मंडळाने त्यांचे अपयश झाकण्यासाठी कारखान्याच्या शेतकी विभागास हाताला धरून सभासदांचा नंबर प्रमाणे आडसाली उस तोडणी होत असताना ही तो उस शेतकीखात्याचे कर्मचारी व उस तोड मजुर शेतकऱ्यांवर दबाव टाकुन सभासदांची परवानगी घेवुन जळीत करून तोडत आहेत. त्यामुळे उसाची तोड लवकर होते परंतु सभासदांचे उसाचे टनेज घटत आहे तसेच कारखाना त्या सभासदांचे प्रती टन ५०/- रू. कपात करून घेत आहे असे दुहेरी नुकसान सभासदांचे संचालक मंडळाने चालविलेले आहे. या संबंधी अनेक शेतकऱ्याच्या तकारी कृती
समितीकडे आल्याने शेतकरी कृती समितीने सोमेश्वर कारखान्यास वरील गंभीर विषयांमध्ये लक्ष द्यावे यासाठी दि.१/१२/२०२२ व दि.६/१२/२०२२ पत्र दिले होते. परंतु कारखान्याने यास कोणतीही
दाद दिली नाही. त्यामुळे कृती समितीने नाईलाजास्तव शेतकरी सभासदांच्या हितासाठी
मा. सहकार मंत्री, मा. पालकमंत्री व साखर आयुक्त यांना पत्रव्यवहार केला होता, याची दखल घेवून जिल्ह्याचे पालकमंत्री मा.चंद्रकांत दादा पाटील सोो यांनी सोमेश्वर कारखान्याच्या तक्रारी अर्जा बाबत सहकार मंत्री यांना चौकशी होवुन उचित कार्यवाही
करावी यासाठी सुचीत केलेले आहे. त्यावर सहकार मंत्री यांनी सोमेश्वर कारखान्याची F.R.P, बेकायदेशिर कपाती व तोडणी वाहतुकीच्या गलथान कारभाराच्या चौकशीचे आदेश मा. साखर आयुक्त यांना दिलेले आहेत.
■■■■■■■■■■■■■■
सोमेश्वर कारखान्याचे तोडणी वाहतुक मजुर उसाचे वाडे मिळत नाही म्हणुन आम्हाला दोन
कांडया वाडयामध्ये द्याव्या लागतील नाहीतर आपण प्रति टन ३० रू. आम्हाला रोख पैसे द्यावेत अशी
मागणी सभासदांना करीत आहेत. तसेच उसामध्ये गवत किंवा थोडीफार वेलीची झाडे असतील तर उस
तोड मजुर तो उस पेटवुन देतात व मग उस तोड करतात. परिणामी शेतकरी सभासदाच्या उस
बिलातुन कारखाना बेकायदेशिर प्रति टन ५० रू कपात करून घेत आहे. तरी शेतकरी कृती समिती
सर्व शेतकरी सभासदांना आवाहन करीत आहे की उस तोड मजुरांना उस तोडीसाठी कोणीही पैसे देव
नये. उस तोड मजुर जर पैसे मागत असतील तर त्याची कारखान्याकडे लेखी तकार करावी व त्याची
प्रत कृती समितीकडे आणुण द्यावी किंवा कृती समितीशी संपर्क साधावा.

सतीश काकडे-
अध्यक्ष,पुणे जिल्हा कृती समिती.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test