Type Here to Get Search Results !

बारामती ! महाराष्ट्र एज्युकेशन सोसा. हरिभाऊ गजानन देशपांडे इं. मि. स्कूल, मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

बारामती ! महाराष्ट्र एज्युकेशन सोसा. हरिभाऊ गजानन देशपांडे इं. मि. स्कूल, मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लढले होते मातीसाठी
जसे तिच्याचसाठी घडले होते.
वीरपुरूष ते मातेसाठी मृत्यूलाही भिडले होते!

बारामती प्रतिनिधी 
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या हरिभाऊ गजानन देशपांडे इंग्लिश मिडीयम स्कूल, मध्ये गुरुवार,दिनांक २६/१/२०२३ रोजी २६ जानेवारी हा प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे  महेश चावले ( क्रीडा अधिकारी,NIS कोच ) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
          राष्ट्रगीत आणि झेंडा गीताचे गायन संगीत शिक्षिका व विद्यार्थीनींनी केले. कु.निधी हेमाडे आणि कु.ज्ञानेश्वरी गवळी या विद्यार्थिनींनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. 
          प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून इयत्ता ७वी,८वी आणि ९वी च्या विद्यार्थ्यांनी परेड तर इयत्ता १ली ते ७वीच्या विद्यार्थ्यांनी कवायतीचे सादरीकरण केले. चि.आदित्य साबळे, कु.भूमिका गायकवाड या  विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्ताने भाषण केले. 
        शाळेच्या मुख्याध्यापिका सोनाली क्षीरसागर यांनी  प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले. "अभ्यास आणि खेळ यांची योग्य सांगड घालून विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होईल असा विश्वास प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांशी बोलताना व्यक्त केला आणि  प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या."
      कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राची नाईक यांनी केले.
          शाळेची सजावट सर्व शिक्षकांनी केली तसेच इतर कामे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पार पाडली. कार्यक्रमाचा शेवट विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून करण्यात आला. अशा प्रकारे अतिशय उत्साहात प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम पार पडला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test