Type Here to Get Search Results !

अहमदनगर ! ७० देशांचा समावेश,नामांकित मान्यवरांची उपस्थिती,बबल थिएटर च्या नाविन्यपूर्ण संकल्पनेतून ४था अहमदनगर अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव साजरा

अहमदनगर ! ७० देशांचा समावेश,नामांकित मान्यवरांची उपस्थिती,बबल थिएटर च्या नाविन्यपूर्ण संकल्पनेतून ४था अहमदनगर अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव साजरा
अहमदनगर- अहमदनगर फिल्म फाउंडेशन आयोजित आणि गौतम मुनोत प्रस्तुत,प्लॅनेट मराठी प्रायोजित,शिंगवी ज्वेलर्स सहप्रयोजित  ४ था अहमदनगर अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFA ) दिनांक २६,२७,२८ जानेवारी २०२३ रोजी जितो ट्रेंड फेअर येथे आधुनिक बबल थिएटर मध्ये मोठ्या जल्लोषात साजरा झाला. 
अशी माहिती महोत्सवाचे स्वागताध्यक्ष श्री.गौतम मुनोत यांनी दिली.
पारितोषिक वितरण
महानगरपालिका आयुक्त डॉ.पंकज जावळे, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष श्री.मेघराज राजेभोसले, स्वागताध्यक्ष श्री.गौतम मुनोत, जिल्हा नियोजन अधिकारी श्री.निलेश भदाणे,पोलीस उपअधीक्षक श्री.संदीप मिटके,
अभिनेते पुष्कर श्रोत्री,श्री.अनिकेत विश्वासराव, अभिनेत्री मानसी कुलकर्णी,दिग्दर्शक श्री.शंतनू रोडे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.अशी माहिती महोत्सवाचे निमंत्रक तथा अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे जिल्हा समन्वयक श्री.शशिकांत नजान यांनी दिली.
यावेळी बोलताना अहमदनगर महानगरपालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे म्हणाले की अहमदनगर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव नगरच्या कलाविश्वात आश्वासक असे मोठे पाऊल आहे.अहमदनगरचे कलाकार तंत्रज्ञ यांचे कार्य प्रभावशाली आहे त्यांना व्यासपीठ आणि संधी मिळणे गरजेचे आहे.महापालिकेच्या वतीने भविष्यात पदाधिकारी,अधिकारी यांच्या संकल्पनेतून चित्रनगरी उभारण्यासाठी निश्चित प्रयत्न होतील.
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ अध्यक्ष श्री.मेघराज राजेभोसले म्हणाले की
चित्रपट क्षेत्र अलीकडच्या काळात नवनवीन प्रयोग करीत आहे त्यांच्या पाठीशी महामंडळ खंबीरपणे उभे आहे.अहमदनगरच्या कलाकारांमध्ये ऊर्जा आहे त्यांना दिशा मिळाली पाहिजे यासाठी आपण स्वतः सहकार्य करू.IFFA महोत्सवाचे भविष्यात नावलौकिक वाढत जाणार असून पुढील योजना त्यांनी महामंडळाकडे सादर करावी यावर नक्कीच सकारात्मक विचार केला जाईल.
श्री.गौतम मुनोत यांनी प्रास्ताविक केले. प्रोग्रामिंग डिरेक्टर श्री.संतोष पाठारे यांनी महोत्सव मागची भुमीका विशद केली. सूत्र संचालन अभिनेते प्रल्हाद कुरतडकर, अभिनेत्री तन्वी किरण यांनी केले आभार फेस्टिवल डिरेक्टरआणि अहमदनगर फिल्म फाऊंडेशन चे सचिव प्रशांत जठार यांनी मानले.
महोत्सवात विदेशातून तुर्कस्थान रिसेल,अमेरीका पीटर यांच्यासह  कलाकार व तंत्रज्ञ आले होते.
अभिनेत्री अश्विनी कासार,दिग्दर्शक महेश काळे,वैशाली केंदळे, मितेश टाके,श्री.श्रेणीक शिंगवी, श्री.गुंजन शिंगवी, महामंडळाचे श्री.अनिल गुंजाळ आण्णा, श्री.समद खान, श्री.अनंत रिसे, श्री.नाना मोरे,श्री.सुधीर कुलकर्णी उपस्थित होते. तत्पूर्वी
दिनांक २६ जानेवारी रोजी श्री.अविनाश ढाकणे ( MFSCDC ) यांच्या हस्ते,स्वागताध्यक्ष श्री.गौतम मुनोत,जितो ट्रेड फेअर चे श्री.अमित  मुथा, श्री.जवाहर मुथा,श्री.अलोक मुनोत,श्री.गौतम मुथा,प्राचार्य श्री.बी.आर.झावरे,श्री.संजय शिंगवी माजी महापौर श्री.बाबासाहेब वाकळे यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले.
तीन दिवस संपन्न झालेल्या या महोत्सवात ४०० प्रवेशिका आल्या होत्या.पैकी निवडक ३० लघुपट,माहितीपट आणि १२ पूर्ण लांबीचे चित्रपट पाहण्याचा आनंद सिनेप्रेमी रसिकांनी अनुभवला. अशी माहिती फेस्टिवल डिरेक्टर श्री.प्रशांत जठार आणि प्रोग्रामिंग डिरेक्टर श्री.संतोष पाठारे यांनी सांगितले.
आमदार श्री.संग्राम जगताप यांचे सहकार्य लाभले
अहमदनगर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यशस्वी करण्यासाठी अहमदनगर फिल्म फाउंडेशनचे सदस्य
सारंग देशपांडे, राहुल उजागरे ,स्वप्नील नजान,सिद्धार्थ टेमकर,कणाद खापर्डे,प्रथमेश बर्डे,सोहम दायमा, सिद्धांत खंडागळे,सिद्धी कुलकर्णी,तेजस अतितकर,राज जोशी, बनसोडे,श्रीपाद कुलकर्णी,मंगेश जोंधळे, अक्षय म्हस्के,अनिकेत फुंदे, महेश गदादे,अंकुश काळे,वसी खान,गणेश लिमकर,सौ.स्नेहा विराज मुनोत- पटेल यांनी परिश्रम घेतले.
या महोत्सवाचे रसिक प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद देऊन स्वागत केले.
अहमदनगर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२३ सविस्तर निकाल पुढील प्रमाणे
उत्कृष्ट चित्रपट -Here it’s Bed of Roses
उत्कृष्ट दिग्दर्शक-  कागलार सतीन आयेस
उत्कृष्ट अभिनेता -  कागलार सतीन आयेस
उत्कृष्ट अभिनेत्री:- मेघा माथुर
उत्कृष्ट छायाचित्र- रमेश भोसले चित्रपट निवास 
उत्कृष्ट ध्वनी संयोजन रॉड्रिगो मोलिणा 
उत्कृष्ट संकलन -भीष्म प्रतिम चित्रपट जिनीबिन चदरिया उत्कृष्ट लघुपट भारतीय विभाग 2021- कदाचित उत्कृष्ट लघुपट भारतीय विभाग 2022 - तळ उत्कृष्ट लघुपट आंतरराष्ट्रीय विभाग - वुमन ऑफ युवर ड्रीम 2021 उत्कृष्ट लघुपट आंतरराष्ट्रीय विभाग - जस्ट लाईक वॉटर 2022 उत्कृष्ट ॲनिमेशन फिल्म -वी आर द वर्ल्ड उत्कृष्ट माहितीपट- बी फॉर आय डाय.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test