इंदापूर ! इंदापूरात रविवारी माळी समाज नव वधू-वर परिचय मोफत मेळाव्याचे आयोजन
इंदापूर : फुले प्रहार सामाजिक संस्थेच्या वतीने इंदापूर,(जि.पुणे) येथील शहा सांस्कृतिक भवन मध्ये माळी समाजातील विवाह इच्छुक नव वधु-वर व पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असुन हा मेळावा विनाशुल्क, कोणतीही फी न घेता आयोजित करण्यात आल्याची माहिती फुले प्रहार सामाजिक संस्थेच्या वतीने दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
सदरचा मेळावा हा पाच मार्च रोजी दुपारी ठीक एक वाजता, शहा सांस्कृतिक भवन,एसटी स्टँड पाठीमागे इंदापूर येथे विनाशुल्क आयोजित करण्यात आलेला असुन मेळाव्यासाठी कोणतेही शुल्क,फी घेतली जाणार नाही. वधू-वर नाव नोंदणी मोफत राहील, मेळाव्यासाठी येताना वधू- वर यांनी एक तास अगोदर मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित राहुन आपली नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. मेळाव्यात विवाह इच्छुक नव वधू-वर, विधवा,विधुर व घटस्फोटीत अशा सर्व स्तरातील वधू-वर यांना आपला भावी जोढीदार निवडण्यासाठी नावनोंदणी करून सहभागी होता येईल.
मेळाव्यासाठी वधू- वर यांचा बायोडाटा व्हाटसप, आॅनलाईन अथवा पोस्टाने स्विकारला जाणार नाही.मेळाव्यासाठी विवाह इच्छुक वधू-वर यांनी स्व:त समक्ष उपस्थित राहणे आवश्यक आहे. वधू-वर परिचय मेळावा हा सामाजिक उपक्रम असुन माळी समाजासाठी फुले प्रहार सामाजिक संस्थेच्या माध्यमातुन मोफत राबविण्यात येत आहे. मेळाव्यासाठी इच्छित वधू किंवा वर हे उपस्थित राहतीलच याची खात्री कोणीही देऊ शकत नाही.त्यामुळे याबाबत कोणतीही तक्रार करता येनार नाही.तरी माळी समाजातील जास्तित जास्त विवाह इच्छुक प्रथम वधू-वर, विधवा, विधूर व घटस्फोटीत वधू - वर यांनी मेळाव्यात आपला भावी जोडीदार निवडण्यासाठी पालकांसोबत उपस्थित रहावे ही विनंती.
( वधू-वर परिचय मेळावा हा सामाजिक, विनाशुल्क व मोफत राबविण्यात येत असलेला उपक्रम असुन बातमी लावावी ही नम्र विनंती)