बारामती ! संत गाडगे बाबा यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन
बारामती : संत गाडगे बाबा यांच्या
जयंतीनिमित्त उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी तहसिल कार्यालयात संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी परिविक्षाधीन तहीलदार नेहा शिंदे, नायब तहसिलदार डॉ. भक्ती सरवदे- देवकाते, परिविक्षाधीन नायब तहसीलदार तुषार गुजवटे यांच्यासह उप विभागीय व तहसिल कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.