Type Here to Get Search Results !

बारामती ! डोर्लेवाडी येथे "जागरुक पालक व सुदृढ बालक" अभियानचे उदघाटन कार्यक्रम संपन्न.

बारामती ! डोर्लेवाडी येथे "जागरुक पालक व सुदृढ बालक" अभियानचे उदघाटन  कार्यक्रम संपन्न.
बारामती - जिल्हा परिषद पुणे,आरोग्य विभाग, पंचायत समिती बारामती,आरोग्य विभाग, प्राथमिक आरोग्य केंद्र डोर्लेवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने जागरुक पालक व सुदृढ बालक अभियानाचे तालुकास्तरीय शुभारंभ आज प्राथमिक आरोग्य केंद्र डोर्लेवाडी येथे आयोजित करण्यात आला. सदर अभियानांचे उद्घाटन  डाॅ.मनोज खोमणे तालुका आरोग्य अधिकारी पंचायत समिती बारामती, डाॅ.प्रतिभा नेवसे,माजी सभापती पं.स.बारामती,  राहुल  झारगड  मा. पं.स.सदस्य पांडुरंग सलवदे,सरपंच डोर्लेवाडी,.दत्तात्रय काळोखे सदस्य ग्रा.पं डोर्लेवाडी, डाॅ.वैशाली देवकाते,डाॅ. बापू दडस वैद्यकीय अधिकारी प्रा आ केंद्र डोर्लेवाडी,समुदाय आरोग्य अधिकारी व सर्व आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका ,व तालुक्यातील नामवंत विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. 
यावेळी दीपप्रज्वलनानंतर बोलतान डाॅ.मनोज खोमणे यांनी तालुक्यातील शुन्य ते अठरा वयोगटातील शहरा सह  एकुण 120000 बालकांची 58 पथका द्वारे येत्या एक महिन्यात संपूर्ण आरोग्य तपासणी  वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक यांच्या मार्फत करण्यात येणार आहेत असे सांगितले. सदर तपासणीत ज्या बालकांना पुढील उपचाराची गरज लागणार आहे, त्यांना शासन दुस-या टप्प्यात मोफत मदत करून त्यांचे आरोग्य समस्येचे निवारण करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
    यावेळी  प्राथमिक आरोग्य केंद्र डोर्लेवाडी मार्फत 
सर्व रोग निदान शिबीरचे आयोजन करण्यात आले. यामध्ये अस्थिरोग, त्वचारोग, नेत्ररोग, हृदयरोग, मधुमेह, स्त्रीरोग,दंतरोग, बालरोग इत्यादीचे तपासणी करून संबंधित यांना योग्य तो उपचार करण्यात आला.सदर शिबीरात  एकुण बाह्यरुग्ण नोंदणी 674 झाली असून काही रुग्णांना पुढील उपचाराकरीता संदर्भसेवा देण्यात आली. 
   
   

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test