महाविद्यालयात “राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० ची अमंलबजावणी” विषयावर दोन दिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्राचे आयोजन.
मु. सा. काकडे महाविद्यालयात राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० व दोन दिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्राचे आयोजन
सोमेश्वरनगर : बारामती तालुक्यातील मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालयात दि. १४ व १५ फेब्रुवारी २०२३ रोजी “राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० ची अमंलबजावणी” या विषयावर दोन दिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. चर्चासत्राच्या उद्घाटन समारंभासाठी उद्घाटक म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता मा. डॉ. विजय खरे, वाणिज्य विद्याशाखेचे अधिष्ठाता मा. डॉ. पराग काळकर व विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता मा. डॉ. मनोहर चासकर इत्यादी उद्घाटक म्हणून उपस्थित होते. मु.सा. काकडे महाविद्यालयाच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य. संजय घाडगे यांनी उद्घाटन समारंभाचे अध्यक्षस्थान भूषविले. उद्घाटन समारंभासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. देविदास वायदंडे, व्यवस्थापन समितीच्या सदस्या प्रा.सुजाता भोईटे, जेजुरी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ.धनाजी नागणे, प्राचार्य फसलें, वरवंड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. व्ही शितोळे व महाविद्यालयाचे सर्व उपप्राचार्य आदि उपस्थित होते.
उद्घाटनपर बीजभाषणात बोलताना मानव्यविद्याशाखेचे अधिष्ठाता, डॉ. विजय खरे यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अमंलबजावणी करण्याची गरज, महत्व, त्याचे स्वरूप, विद्यापीठाचे पुढील काळातील वर्गीकरण, संस्थांची पुनर्रचना व त्यांचे बळकटीकरण व शासनाची भूमिका आदि विषयांवर बोलताना शिक्षणाचा प्राचीनकाळापासूनचा आढावा त्यांच्या बीजभाषणात घेतला. भविष्यकाळात राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अमंलबजावणी करताना शिक्षकांची भूमिका महत्वाची असून काळानुसार शिक्षकांनी अदयावत राहणे, परदेशी विद्यापीठाचे भारतातील आगमन, श्वाश्वत विकास व जागतिक शिक्षण विकास कृती कार्यक्रम २०३० इत्यादी विषयावर बोलताना वाणिज्यविद्याशाखेचे अधिष्ठाता, मा. डॉ. पराग काळकर यांनी आपले मत व्यक्त केले. मा. डॉ. मनोहर चासकर यांनी विद्यार्थ्याचे भविष्यकाळातील अध्ययन, मुल्यांकन, केडीटप्रणाली शिक्षकांचा वर्कलोड इत्यादी विषयांवर आपले मत व्यक्त केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांनी त्यांच्या प्राचार्य मनोगतात बोलताना नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा तसेच शिक्षणक्षेत्रातील येउ घातलेल्या नवीन आव्हानांचा सविस्तर आढावा घेतला. अध्यक्षीय भाषणात बोलताना श्री. संजय घाडगे यांनी संस्थापातळीवर कराव्या लागणा-या बदलाबाबत बोलताना संस्थाचे अंमलबजावणीसाठी पूर्ण सहकार्य राहील अशी ग्वाही दिली. उद्घाटन समारंभाचे प्रस्ताविक चर्चासत्राचे समन्वयक प्रा. डॉ. संजू जाधव यांनी केले तर आभार व सूत्रसंचालन प्रा. अच्युत शिंदे यांनी केले.
चर्चासत्राच्या पहिल्या दिवसाच्या दुपारसत्रासाठी टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयाचे प्राचार्य आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे माजी सदस्य मा. डॉ. संजय चाकणे उपस्थित होते. शिक्षणाचे विभक्त विद्याशाखाऐवजी बहुविद्याशाखीय व आंतरविद्याशाखीय अध्ययन, अध्यापनाची गरज, साहित्य, संस्कृती, कौशल्य, भाषा, परंपरा खेळ विज्ञान आणि गणित इ. सह समग्र अभिसण व्यवस्थेची गरज यावर सविस्तर मत त्यांनी व्यक्त केले.
नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० ची अमलबजावणी करताना ग्रामीण भागातील महाविद्यालये, अध्यापक आणि विद्यार्थी यांच्यावर होणारा परिणाम हे एक आव्हान अनेक असे मत केडगांव कॉलेजचे प्राचार्य डॉ. नंदकुमार जाधव यांनी व्यक्त केले.
चर्चासत्राच्या दुस-या दिवसाच्या पहिल्या सत्रासाठी झामोणी कंपणीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रसन्न झा उपस्थित होते. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० आणि तंत्रज्ञान याविषयी बोलताना यांनी सर्व घटकांना तंत्रज्ञान वापराची माहिती करून अध्यापन करण्याची गरज व्यक्त केली. दुपारच्या सत्रासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांनी सर्व सहभागी शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० चे शिक्षणातील सर्व घटकांवर होणारे परिणाम या विषयांवर सखोल असे मार्गदर्शन केले.
चर्चासत्राच्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रकांत दांगट पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यापरीषदेचे सदस्य प्राचार्य मा. डॉ. सुधाकर जाधवर उपस्थित होते. तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांनी अध्यक्षपद भूषविले. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० ची अमंलबजावणी करताना भारतातील उच्च शिक्षणातील धोरणातील होणा-या संपूर्ण पूर्नरचणेची माहिती, भारताची समृध्द परंपरा, भाषा, संस्कृती, गुरूकुल शिक्षण व्यवस्था आणि आधुनिक शिक्षकांची भूमिका यावर प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर यांनी आपली परखड भूमिका मांडली. अध्यक्षीय भाषणात बोलताना प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांनी दोन्ही दिवसांच्या चर्चासत्राच्या सर्व सत्राचा आढावा घेउन चर्चासत्र यशस्वी करण्यासाठी सर्वांनी केलेल्या कामाचे कौतुक केले. समारोप समारंभासाठी महाविद्यालयाचे सहसचिव श्री. सतिश लकडे, उपप्राचार्य डॉ. जगन्नाथ साळवे, डॉ. कदम जे.जे, डॉ. प्रविण ताटे - देशमुख, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा. जगताप रविंद्र, सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. चर्चासत्राचे समन्वयक डॉ. संजू जाधव यांनी चर्चासत्राचे आभार तर प्रा. ए. एस. शिंदे यांनी सुत्रसंचालन केले.