Type Here to Get Search Results !

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते व माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांची वाणेवाडी ग्रामपंचायतला भेट...विकासकामांसाठी मदत करणार

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते व माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांची वाणेवाडी ग्रामपंचायतला  भेट...
विकासकामांसाठी मदत करणार 


सोमेश्वरनगर -बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते व माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांची बारामती तालुक्यातील दौऱ्या निमित्त ग्रामपंचायत वाणेवाडी येथे सोमवार दि ६ रोजी भेट दिली या प्रसंगी वाणेवाडीचे उपसरपंच धीरज चव्हाण,सदस्य रवीराज जगताप,बाळासाहेब जगताप तसेच शिवसेनेचे  जिल्हाध्यक्ष सुरेंद्रजी जेवरे  आणि तालुका प्रमुख स्वप्नील जगताप उपस्थित होते.

आज बारामती तालुक्यातील दौऱ्या निमित्ताने आले होते ....यावेळी बापुंनी गावची लोकसंख्या तसेच गावातील विकासकामांची माहीती घेतली...तसेच चर्चे दरम्यान उपसरपंच,सदस्य यांना गावात चांगले काम करा काही अडचणी असतील तर सांगा असे सांगताच सदस्य रविराज जगताप यांनी गावात गटर साठी १ कोटी निधीची आवश्यकता आहे असे बाप्पुंना सांगितले.बाप्पुंनी पण त्वरीत सदर कामाचा प्रस्ताव बनवून तालुका प्रमुख स्वप्नील जगताप यांच्याकडे द्या निधी लगेच मंजुर करून देतो अशी ग्वाही दिली...विकासकामांसाठी हवी तेवढी मदत करणार असं बापू यावेळी बोलताना म्हणाले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test