धनुष्यबाण’ शिंदे गटाला; निवडणूक आयोगाच्या निर्णायामुळे ठाकरे गटाला हादरा
हा निर्णय घटनाविरोधी असल्याची प्रतिक्रिया ठाकरे गटाकडून व्यक्त
मुबई - शिवसेनेचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह आणि शिवसेना हे नाव एकनाथ शिंदे गटाला देण्याचा महत्वाचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव देण्याचा महत्वपूर्ण निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला आहे. निवडणूक आयोगाचा हा निर्णय ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. निवडणूक आयोगाचा हा निर्णय घटनाविरोधी असल्याची प्रतिक्रिया ठाकरे गटाकडून व्यक्त करण्यात येत आहे.



