Type Here to Get Search Results !

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त उपक्रमांत संबंधित विभागांनी सहभाग घ्यावा-कृषि आयुक्त सुनील चव्हाण

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त उपक्रमांत संबंधित विभागांनी  सहभाग घ्यावा-कृषि आयुक्त सुनील चव्हाण
पुणे -  बदलत्या जीवनशैलीत आहाराकडे होत असलेले दुर्लक्ष आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या आजारांवर मात करण्यासाठी तृणधान्याचा आहारात समावेश वाढवण्यासाठी २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे.  तृणधान्याचे उत्पादन वाढीसाठी  व त्याचा आहारात वापर वाढवण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी सक्रियता वाढवावी आणि त्या संदर्भातील विविध उपक्रमात सहभाग घ्यावा, अशा सूचना कृषि आयुक्त सुनील चव्हाण यांनी आज दिल्या.
  
तृणधान्य वर्षानिमित्त नियोजनासाठी स्थापित राज्य कृती दलाची पहिली बैठक साखर संकुल,पुणे  येथे संपन्न झाली, त्यावेळी श्री. चव्हाण बोलत होते.   यावेळी कृषि प्रक्रिया आणि नियोजन संचालक सुभाष नागरे, निविष्ठा व गुण नियंत्रण संचालक दिलीप झेंडे,  कृषी विस्तार व प्रशिक्षण संचालक विकास पाटील, ,परभणी संशोधन कृषि विद्यापीठाचे संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, माहिती उपसंचालक डॉ.राजू पाटोदकर, समाजकल्याण विभागाचे उपसंचालक एस.एस. रणखांबे आदि उपस्थित होते. 

    श्री. चव्हाण पुढे म्हणाले, पारंपरिक लोककलांच्या माध्यमातून गावोगावी विविध कार्यक्रम घेऊन  लोकांना समजेल अशा सोप्या भाषेत तृणधान्याचे महत्त्व पटवून देण्यात येणार आहे. तसेच पथनाट्य, प्रशिक्षणे,  विविध माध्यमांद्वारे माहिती प्रसारित करावी. महाविद्यालये, शासकीय कार्यालये याठिकाणी प्रचार, प्रसिद्धी करावी.  पुढच्या रब्बी हंगामापर्यंत प्रत्येक गावात सीड बँक तयार करावी, त्यामुळे तृणधान्याच्या उत्पादन वाढीस निश्चितच मदत होईल.

 प्रशिक्षण आयोजित करताना तृणधान्याच्या महत्त्वाबरोबरच अन्य लोकोपयोगी विषयाची माहिती दिल्यास प्रशिक्षणास चांगला प्रतिसाद मिळेल. उत्पादन व उत्पादकता वाढ, पोषण मूल्य व आरोग्य विषयक कायदे, मूल्यवर्धन, प्रक्रिया व पाककृती विकास, नव उद्योगातून व्यावसायिक दृष्टीकोन वाढवणे, प्रचार-प्रसिद्धीतून जनजागृती करणे, निर्यातवृद्धी व धोरणात्मक निर्णयातून अंमलबजावणी या सप्तसूत्रीद्वारे पौष्टिक तृणधान्य वर्ष साजरे करण्यात येत आहे, असे आयुक्त चव्हाण यांनी सांगितले. 

     कृषी विस्तार प्रशिक्षण संचालक श्री. पाटील यांनी सादरीकरणाद्वारे  ‘महाराष्ट्र मिलेट मिशन’ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. ते म्हणाले आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ साठी राज्यात सुमारे २५० कोटीची तरतूद करण्यात आली आहे.  तृणधान्य विशेष महिना संकल्पनेअंतर्गत जानेवारी महिना- बाजरी, फेब्रुवारी- ज्वारी, ऑगस्ट- राजगिरा, सप्टेंबर- राळा, ऑक्टोबर- वरई आणि डिसेंबर- नाचणी याप्रमाणे उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. कृषि विद्यापिठांतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती देऊन उत्पादन वाढीसाठी प्रत्येक जिल्ह्यात घेण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांचीदेखील त्यांनी माहिती दिली.

यावेळी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे संचालक डॉ.दत्तप्रसाद वासकर यांनी येत्या रब्बी हंगामात १०० एकर शेतीमध्ये परभणी शक्ती ही ज्वारीचे वाण पेरण्यात येणार असल्याचे सांगितले.

माहिती उपसंचालक डॉ.राजू पाटोदकर यांनी माहिती व जनसंपर्क विभागामार्फत माहे फेब्रुवारी २०२३ चा लोकराज्य तृणधान्य विशेषांक काढल्याचे सांगून या विभागामार्फत विविध प्रसार माध्यमांद्वारे सर्वांगीण प्रसिद्धी करण्यात येईल असे सांगितले. अर्चना ठोंबरे व डॉ. सोनम कापसे यांनी आहारातील तृणधान्याचे महत्त्व सांगितले.

 या बैठकीस औरंगाबाद संशोधन कृषि विद्यापीठाचे सहयोगी संचालक डॉ. सूर्यकांत पवार, परभणी ज्वारी संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. एल. एन. जावळे, महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहूरीचे विभाग प्रमुख डॉ. अमोलिक विजय, कोल्हापूर नाचणी संशोधन प्रकल्पाचे डॉ. योगेश बन, शेकरु फाऊंडेशनचे बिभिषण बागल, पुण्याचे अतिरिक्त प्रकल्प संचालक ज्ञानेश्वर बोटे,  आहारतज्ञ  अर्चना ठोंबरे, डॉ. सोनम कापसे, नाशिकच्या प्रगती अभियानच्या अश्विनी कुलकर्णी तसेच राज्यातील कृषि विभागीय अधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test