Type Here to Get Search Results !

फुले प्रहार सामाजिक संस्थेचे कार्य कौतुकास्पद..अॅड. समिर टिळेकर.इंदापूरातील वधू-वर परिचय मेळाव्यास मोठा प्रतिसाद;३३६ वधू-वरांनी केली मोफत नाव नोंदणी

फुले प्रहार सामाजिक संस्थेचे कार्य कौतुकास्पद..अॅड. समिर टिळेकर.
इंदापूरातील वधू-वर परिचय मेळाव्यास मोठा प्रतिसाद;३३६ वधू-वरांनी केली मोफत नाव नोंदणी.

इंदापूर : माहिती व तंत्रज्ञानाच्या युगातील स्पर्धेमुळे माणसाची जिवनशैली गतिमान बनल्याने स्वत:च्या कुटुंबाकडे लक्ष द्यायला लोकांना वेळ पुरत नाही.पूर्वी समाजात एकत्र कुटूंब पद्धती होती.त्यामुळे घरातील जेष्ठ मंडळीच विवाहाचे निर्णय घ्यायचे.परंतु सध्या विभक्त कुटूंब पद्धतीमुळे घरातील जाणत्या मंडळीकडे दुर्लक्ष होत आहे.मुलां-मुलींना योग्य व अपेक्षीत स्थळे शोधण्यासाठी पालकांना मौलिक वेळ वाया घालवुन सुद्धा इच्छित स्थळे उपलब्ध होत नाहीत.त्यामुळे मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.अशा वेळी माळी समाजाचा वधू-वर परिचय मेळावा आयोजित करून विवाह इच्छुकांची मोफत नाव नोंदणी करत वधू-वरांची इच्छित स्थळे उपलब्ध करून देणार्‍या फुले प्रहार सामाजिक संस्थेचे कार्य कौतुकास्पद असल्याचे मत अॅड.समिर टिळेकर यांनी इंदापूर येथे माळी समाज वधू-वर मेळाव्यात बोलताना व्यक्त केले.

           शहा सांस्कृतिक भवन इंदापूर येथे फुले प्रहार सामाजिक संस्थेच्या वतीने माळी समाज वधू-वर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला होता.त्यावेळी अॅड.
समिर टिळेकर बोलत होते.याप्रसंगी भाजपा पश्चिम महाराष्ट्र पंचायत ग्राम विकास विभाग प्रमुख युवराज म्हस्के,
कर्मयोगी सह.सा कारखाना संचालक सतिश व्यवहारे, माजी संचालक अतुल व्यवहारे,तात्यासाहेब वडापुरे,बहुजन मुक्ती पार्टी पुणे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब भोंग, अॅड.नितिन राजगूरू,माळवाडी माजी सरपंच नागनाथ व्यवहारे,
राष्ट्रवादी तालुका कार्याध्यक्ष अतुल झगडे,पोपटराव धवडे,राष्ट्रवादी महीला तालकाध्यक्षा छायाताई पडसळकर, वर्षाताई भोंग,रेष्मा शेख,स्मिताताई पवार,दैनिक सकाळ वार्ताहार मनोहर चांदणे,दै.सध्या वार्ताहार काका मांडरे,दै.जनप्रवास वार्ताहार शिवाजी पवार,स्वराज न्युज चे संपादक प्रकाश आरडे,दिपक खिलारे,भगनवान मोरे (सर) इत्यादी प्रमुख उपस्थित होते.

        याप्रसंगी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC)
राज्यसेवा परिक्षेतुन उपजिल्हाधिकारी पदी निवड झालेले माळवाडी ता.इंदापूर येथील सुपुत्र विकास तुकाराम व्यवहारे यांचा फुले प्रहार संस्थेच्या वतीने सन्मानचिन्ह फेटा बांधून सत्कार करण्यात आला.अल्पावधितच नावा रूपाला आलेली फुले प्रहार सामाजिक संस्था व त्यांचे टीमचे सामाजिक कार्य उल्लेखनिय आहे.समाजातील एकमेकांची मने जोडण्याचे कार्य वधू-वर परिचय मेळाव्याच्या माध्यमातुन होत आहे.कार्यकर्ता हा लहान किंवा छोठा असला तरी त्याच्या सामाजिक कार्याची दखल घेवुन उल्लेखनिय कार्याचा गौरव क्वचितच ठिकाणी केलेला पहायला मिळतो.अशा सामाजिक कार्यकर्त्याकडे लक्ष देवून त्याच्या कार्यास समाजाने प्रोत्साहन देण्याचे आवाहन नवनियुक्त उपजिल्हाधिकारी विकास व्यवहारे यांनी सत्कार प्रसंगी बोलताना केले.

        माळी समाज वधू-वर परिचय मेळावा यशस्वी करण्यासाठी फुले प्रहार चे संस्थापक अध्यक्ष सुधाकर बोराटे,संस्थापक उपाध्यक्ष चंद्रकांत बोराटे, प्रदेश युवा कार्याध्यक्ष गणेश जाधव,पश्चिंम महाराष्ट्राध्यक्ष बापू बोराटे,पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख रविंद्र म्हेत्रे,पश्चिंम महाराष्ट्र कार्याध्यक्ष आशोक देवकर,पुणे जिल्हाध्यक्ष संतोष नेवसे, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष संजय राऊत,इंदापूर तालुकाध्यक्ष बबनराव खराडे, बारामती शहराध्यक्ष दादासाहेब गोरे,बारामती शहर युवकाध्यक्ष विकास म्हेत्रे,बारामती शहर युवक उपाध्यक्ष सुयोग गायकवाड,इत्यादींनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड.नितिन राजगुरू यांनी केले,सुत्रसंचलन संतोष नरूटे तर आभार बबनराव खराडे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test