Type Here to Get Search Results !

बारामती ! वाहनधारकांसाठी महत्त्वाची सूचना आजपासून हा नियम लागू....

बारामती ! वाहनधारकांसाठी महत्त्वाची सूचना आजपासून हा नियम लागू....
बारामती प्रतिनिधी (दिगंबर पडकर)
वाहन धारकांना वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र काढण्यासाठी त्या त्या मॉडेलच्या कंपनीकडून ऑनलाइन वेग नियंत्रण पत्र काढल्याशिवाय संबंधित वाहनाच्या योग्यता प्रमाणपत्राची तपासणी होणार नाही. असा अधिनियम केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जारी केला आहे. 


1 मार्चपासून लागू करण्यात आलेल्या या नियमानुसार वाहनधारकांना मॉडेल नुसार त्या त्या कंपनीकडूनच ऑनलाईन पद्धतीने वेग नियंत्रण पत्र घेणे बंधन कारक राहणार आहे.असे निर्देश केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे असणार आहे.
            काही उत्पादक मान्यता प्राप्त नसलेले वेग नियंत्रक अवैधरित्या वाहनांवर बसून वाहनधारकांची फसवणूक करत असल्याचे निदर्शनास आले होते. तसेच वेग नियंत्रण बसवण्याचा उद्देश सफल होण्याच्या दृष्टीने सर्वोच्च न्यायालयात रीट याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानुसार न्यायालयाने 2017 रोजी दिलेल्या निर्देशानुसार वाहन प्रणालीवर परिवहन सवर्गातील वाहनावर बसवलेल्या वेग नियंत्रकाची जोडणी वाहनाच्या  डेटाबेसशी करुन पुढील बाबींची पूर्तता होत असल्याची खात्री करून घेण्याबाबत केंद्र शासनाने निर्देश जारी केले आहे.


यामध्ये वाहनात बसविण्यात येणारे वेग मर्यादित उपकरण हे त्या संबंधित वाहन मॉडेलचे असल्याचे तपासणी संस्थेकडून मान्यताप्राप्त असणे आवश्यक आहे. मान्यता मिळाल्यानंतर राष्ट्रीय राष्ट्रीय सूचना केंद्र नवी दिल्ली हे प्रत्येक वेग मर्यादित उपकरण उत्पादकांना वाहन प्रणालीवर मान्यताप्राप्त माहिती भरण्याकरिता युनिक युजर नेम व पासवर्ड जारी करेल तसेच वेग मर्यादित उपकरण उत्पादक वाहन प्रणालीवर वेग मर्यादित उपकरण, (SLD)/वेग नियंत्रण बनावट आणि मॉडेल, मान्यता प्राप्त प्रमाणपत्र (TAC)/किंवा उत्पादन अनुरूप प्रमाणपत्र (COP)/उपलब्ध असल्यास, वाहनाच्या मॉडेलचे नाव भरणे आवश्यक आहे.


केंद्रीय मोटर वाहन नियम १९८९ च्या नियम 118 मधील तरतुदीनुसार (ज्या वाहनांना सूट दिली आहे ते सोडून) वेगवेगळ्या परिवहन वाहनांना दिलेली वेग नियंत्रकाची वेग मर्यादा सीमित होणे आवश्यक आहे जर ती होत नसेल तर उत्पादकावर कारवाई करण्यात येणार आहे. असे वेग नियंत्रक वाहनांवर बसविले जाणार नाहीत. अशी खात्री वाहनधारकांना संबंधित परिवहन कार्यालयाने करून द्यावी. तसेच वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाच्या चाचणीच्या वेळी वाहनप्रणाली मधील ऑनलाइन योग्यता प्रमाणपत्र जारी करताना वेग नियंत्रण बसविण्यासंदर्भात केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या या सूचनांचे काटेकोर पालन करण्यात यावे असे पत्र परिवहन आयुक्तांनी जारी केले आहे.
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
वाहनधारकांना वाहन पासिंग करण्यासाठी या नव्या नियमानुसार त्या त्या वाहनाच्या मॉडेल निहाय ऑनलाइन वेग नियंत्रण पत्र काढणे. बंधनकारक असणार आहे. त्याशिवाय तपासणी व पासिंग होणार नाही....
राजेंद्र केसकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बारामती

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test