Type Here to Get Search Results !

सोरटेवाडी येथे "राष्ट्रीय विज्ञान दिन" निमित्त गहू शिवार फेरी.

सोरटेवाडी येथे "राष्ट्रीय विज्ञान दिन" निमित्त गहू शिवार फेरी.
सोमेश्वरनगर -  राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त, सोरटेवाडी (ता. बारामती ) येथील शिवाजी महादेव सोरटे यांच्या एम. ए. सी. एस. ६४७८ या अधिक उत्पन्न देणाऱ्या गहू पिकाच्या क्षेत्रावर शिवार फेरी आयोजित करण्यात आली होती. सदर कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज) व आघारकर संशोधन संस्था यांच्या मार्फत करण्यात आले होते. यावेळी, इतर शेतकऱ्यांच्या एम. ए. सी. एस. ६२२२ व एम. ए. सी. एस. २९७१ (खपली), या जातीच्या क्षेत्राचीही पीक पाहणी केली गेली.१९ हे गहू वाण, आघारकर संशोधन संस्था यांनी विकसित केले असून महाबीज मार्फत हे बियाणे शेतकऱ्यांना माफक दरात पुरविले जाते. सदर वाणांची कमाल उत्पादन क्षमता एकरी २० ते २५ क्विंटल पर्यन्त आहे. चपाती प्रत व गुणवत्ता इतर वाणांच्या तुलनेत सरस आहे. शेतकऱ्यांच्या शेतावर या वाणांचा फुटवा जास्त असून लोंबीही भरदार आहे. यावेळी उपस्थित असणाऱ्या शेतकऱ्यांनीही या जाती दर्जेदार असल्याचे सांगितले.( यावेळी उपस्थित असणाऱ्या महाबीज व कृषि खात्याच्या अधिकाऱ्यानी चालू वर्षी गव्हाचे क्षेत्र अधिक असल्याचे सांगितले. तसेच शेतीत महाबीजचे विविध बियाणे, तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे तसेच जमिनीची प्रत चांगली ठेवण्याचे आवाहन केले. शासनाच्या विविध योजनांविषयी माहिती दिली. आघारकर संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञानी गहू वाणांची वैशिष्ट्ये व उपयोग याविषयी मार्गदर्शन केले व शेतकऱ्यांच्या शंकाना उत्तरे दिली) या कार्यक्रमास, महाबीज पुणे जिल्हा व्यवस्थापक  अष्टणकर,. जगदाळे, मंडल कृषि अधिकारी, श्री. मोरे तसेच आघारकर संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञ, डॉ. बाविस्कर, डॉ. यशवंथ, डॉ.नवाथे, डॉ. चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. सोरटेवाडी व होळ गावातील शेतकरी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास हजर होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test