Type Here to Get Search Results !

कौतुकास्पद ! मु.सा.काकडे महाविद्यालयाच्या तीन पीएच.डी संशोधन केंद्रांना मान्यता

कौतुकास्पद ! मु.सा.काकडे महाविद्यालयाच्या तीन पीएच.डी संशोधन केंद्रांना मान्यता
सोमेश्वरनगर: पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात नामांकित असलेल्या महाविद्यालयांपैकी एक मु. सा. काकडे महाविद्यालयास मानव्यविज्ञान विद्याशाखेमधील इतिहास व मराठी तसेच वाणिज्य विद्याशाखेतील कॉमर्स अँड मॅनेजमेंट या विषयातील पीएच.डी संशोधन केंद्रास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची मान्यता मिळाली. या तीन संशोधन केंद्रांना मान्यता मिळाल्याने ग्रामीण भागातील संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना संशोधन करण्यासाठी संधी प्राप्त झाली आहे. या नवीन अभ्यासक्रमांच्या मान्यतेमुळे महाविद्यालयीन व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य तसेच महाविद्यालयाचे अध्यक्ष  सतीशराव काकडे देशमुख व महाविद्यालयाच्या विकास समितीचे अध्यक्ष अभिजीत काकडे देशमुख यांनी आनंद व्यक्त केला. यासंबंधी बोलताना. सतीशराव काकडे यांनी अशी भावना व्यक्त केली की, “गेल्या अनेक वर्षापासून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संशोधनाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. या मान्यताप्राप्त संशोधन केंद्रांच्या वतीने ग्रामीण भागातील उच्चशिक्षित तरुणांना पीएच.डी संशोधनाच्या संधी मु. सा. काकडे महाविद्यालयात उपलब्ध होतील. तसेच आम्ही सोमेश्वर परिसरातील विद्यार्थ्यांना व्यवसायाभिमुख अभ्यासक्रमांच्या संधीदेखील उपलब्ध व्हाव्यात म्हणून राज्य शासनाच्या कौशल्य विकास महामंडळाच्या सहाय्याने, प्रमोद महाजन कौशल्य व  उद्योजकता विकास अभियानांतर्गत, तसेच विप्रा स्किल इंडिया या संस्थेच्या सहयोगाने पाच कौशल्याधिष्ठित शॉर्ट टर्म कोर्सेस सुरू केले आहेत. यामध्ये फॅशन डिझायनिंग, फूड प्रोसेसिंग, मेकअप आर्टिस्ट, ड्राट्समन मेकॅनिकल, डोमेस्टिक डाटा एन्ट्री ऑपरेटर अशा रोजगाराभिमुख कोर्सेसचा समावेश आहे. हे सर्व कोर्सेस महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना विनाशुल्क उपलब्ध करून देण्यात आले आहेत.”
वरील संशोधन केंद्रास विद्यापीठाने मान्यता दिल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य डॉ. देविदास वायदंडे यांनी विद्यापीठाचे आभार व्यक्त केले. तसेच महाविद्यालयाचे अध्यक्ष मा. श्री सतीशराव काकडे देशमुख व महाविद्यालयीन विकास समितीचे अध्यक्ष  अभिजीत काकडे देशमुख यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे  व महाविद्यालयाचा सर्व स्टाफ यांचे अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test