एम. पी. सय्यद यांचा उत्कृष्ट मंडल अधिकारी म्हणून गौरव
बारामती: बारामती येथील प्रशासकीय भवनात १ मे २०२३ रोजी महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिन साजरा करण्यात आला. सकाळी प्रशासकीय भवनाच्या आवारात महाराष्ट्र दिनानिमित्त राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या ध्वजारोहणाला प्रशासकीय सेवेतील सर्व अधिकारी आणि कर्मचारी तसेच नागरीक आणि पत्रकार उपस्थित होते.
ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपल्यानंतर प्रशासन भवनात कामगार दिन साजरा करण्यात आला. या कामगार दिनानिमित्त प्रशासकीय सेवेत काम करताना उत्कृष्ट कर्मचारी आणि अधिकारी यांचा सत्कार अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बारामतीचे मंडलअधिकारी एम. पी. सय्यद यांचा उत्कृष्ट मंडल अधिकारी पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले. यावेळी प्रशासकीय सेवेतील सर्व कर्मचारी, अधिकारी, प्रांताधिकारी, तहसिलदार, प्रशासकीय विभाग प्रमुख उपस्थित होते.