सोमेश्वरनगर ! डॉ नारायण राजूरवार यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र अभ्यास मंडळाच्या सदस्यपदी निवड
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील मु.सा.काकडे महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ नारायण मधुकरराव राजूरवार यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र अभ्यास मंडळाच्या सदस्यपदी मा.कुलगुरू यांनी नेमणूक केली. महाविद्यालयाच्या संस्थेचे मा.अध्यक्ष सतीश भय्या काकडे देशमुख ,कॉलेजच्या कॉलेज डेव्हलपमेंट कमिटीचे अध्यक्ष मा.अभिजित भैय्या काकडे देशमुख , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ देविदास वायदंडे ,सर्व प्राध्यापक यांनी अभिनंदन केले आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या