Type Here to Get Search Results !

महत्वाची बातमी ! विध्यार्थीची दहावी निकालची प्रतीक्षा संपलीउद्या शुक्रवार दि. २ जून ऑनलाईन जाहीर ;वेळ आणि निकाल पाहण्यासाठी ची लिंक सह माहिती....

महत्वाची बातमी ! विध्यार्थीची  दहावी निकालची प्रतीक्षा संपली

उद्या शुक्रवार दि. २ जून ऑनलाईन जाहीर ;

वेळ आणि निकाल पाहण्यासाठी ची लिंक सह माहिती....


विशेष बातमी - महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवार दि. २ जून २०२३ रोजी जाहीर होणार आहे. बोर्डाकडून यासंदर्भात अधिकृत माहिती देण्यात आली आहे.. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च - एप्रिल २०२३ मध्ये या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. राज्यातील एकूण विद्यार्थ्यांमध्ये ८ लाख, ४४ हजार, ११६ विद्यार्थी तर ७ लाख, ३३ हजार, ६७ विद्यार्थिनींनी दहावीची परीक्षा दिली होती. याशिवाय ८ हजार १८९ दिव्यांग विद्यार्थी व ७३ ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. दरम्यान, परीक्षेनंतर दहावीचा निकाल कधी लागणार? याची प्रतिक्षा पालकांसह विद्यार्थ्यांना होती. आता ही प्रतिक्षा संपली असून उद्या  दुपारी १ वाजता ऑनलाईन निकाल जाहीर होणार आहे. 

www.mahresult.nic.in  या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test