Type Here to Get Search Results !

जुन महीना सरला तरी जोराचा मान्सून पाऊस पडणा....सोमेश्वर पट्ट्यातील अडसाली ऊस लागवडी साठी शेतकरी सज्ज .

जुन महीना सरला तरी जोराचा मान्सून पाऊस पडणा....

सोमेश्वर पट्ट्यातील अडसाली ऊस लागवडी साठी शेतकरी सज्ज .
सोमेश्वरनगर - मान्सूच्या प्रतिक्षेत असलेल्या बळीराजासाठी आनंदाची बातमी आहे. मान्सूच्या  वाटचालीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे.  मान्सूसाठी अनुकूल वातावरण निर्माण होणार असून, मान्सूनचा वेग वाढणार असल्याचे चित्र वातावरणातील बदलाने दिसत आहे. गेले चार पाच दिवस बारामतीतील काही भागांमध्ये  सध्या पाऊस पडत आहे. पडत असलेल्या  पावसामुळे जमीनीच्या मशागतींना वेग येणार असून हंगामी पिकांना बाजरी पिक लागवडीसाठी उशीर झाला असला तरी शेतकरी पेरणीपूर्व कामाला लागले आहेत. जूनच्या शेवटच्या आठवड्यात मान्सून केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
दरम्यान सध्या राज्याच्या अनेक भागात मान्सूनपूर्व पाऊस पडला आहे. पाऊस पडल्याने बळीराजाला दिलासा मिळाला असून, शेतीच्या मशागतीच्या कामाला सुरुवात झाली आहे. बारामती तील  सोमेश्वरनगर व माळेगाव परिसर हा ऊस बागायत पट्टा असल्याने एक महिन्या पासून हजारो एक्कर क्षेत्र आडसाली ऊस लागवडी साठी तयार करत पावसाच्या प्रतीक्षेत आहे तर दोन दिवस काही भागात पाऊस झाल्याने पेरणीपूर्व मशागतीला शेतकऱ्यांनी सुरुवात केल्याचे दिसून येत आहे. दरम्यान अद्याप मान्सून राज्यात दाखल झाला नसून, शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा सल्ला कृषीतज्ज्ञाकडून देण्यात येत आहे.
■■□■■■■■■■□■■■□■■■■■□
सोमेश्वर हा ऊस बागात पट्टा असल्याने सोमेश्वर पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी आडसाली ऊस लागवडी साठी ऊस शेती तयारी केली आहे... मान्सून पाऊस झाला तर वेळेत लागण होत ऊस उत्पादन चांगला 
प्रगतशील शेतकरी-हिंदुराव सकुंडे,वाघळवाडी


बाजरी पिकाला जरी उशीर झाला असला तरी मान्सून पाऊस  लवकर झाला तर हे पीक हाताला लागेल.
शेतकरी - अतुल रासकर
रासकरमळा-करंजे


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test