Type Here to Get Search Results !

दुर्देवी घटना ...अंगावर डीझेल ओतून पेटवून देऊन पत्नीची हत्या करणाऱ्या पतीस जन्मठेप..यवत मधील घटना.

दुर्देवी घटना ...अंगावर डीझेल ओतून पेटवून देऊन पत्नीची हत्या करणाऱ्या  पतीस जन्मठेप..यवत मधील घटना.
बारामती-  दुर्देवी घटना अंगावर डीझेल ओतून पेटवून देऊन पत्नीची हत्या करणाऱ्या पतीस बारामतीतील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश जे. पी. दरेकर यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली...उमेश रामचंद्र गायकवाड असे आरोपीचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार दौंड तालुक्यातील यवत येथे दिनांक १९मे २०१२ रोजी ही घटना घडली होती. त्याने त्याची पत्नी उषा हिच्या अंगावर डीझेल ओतून पेटवून देत तीची हत्या केली. 
याबाबत यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल होता. आरोपीउमेश यास दारूचे व्यसन होते. त्यातच तो गावठी दारू आणून त्याची विक्री करत होता. त्यास उषा विरोध करत असल्याने उमेश तिला मारहाण करत,१९ मे २०१२ रोजी उमेशने विकायला आणलेली गावठी दारू विकली न गेल्याने स्वतःच प्यायला सुरुवात केली. उषाने त्यास विरोध केला व
दारूचा ग्लास ओतून दिला. त्यावरून उमेशने
उपास मारहाण केली. त्यामुळे उषाने राहीलेली
दारू ओतून दिली. त्यानंतर उमेशने उषाच्या
अंगावर डीझेल ओतून पेटवून दिले. उपाने पेट
घेतल्यावर तिला विझवण्याचा प्रयत्न केला.
त्यामध्ये त्यालाही हाताला भाजले. त्यांच्या
मुलांनी घटना पाहिली होती. तिने मृत्यूपूर्व जबाब
दिला. आलेला पुरावा हा आरोपी उमेशच्या
विरोधात होता. त्या अनुषंगाने सरकारी वकील
प्रसन्न जोशी यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून
बारामतीच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश
जे. पी. दरेकर यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक
बाळासाहेब कोपनर यांनी केला होता. सरकार
पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील प्रसन्न
जोशी यांनी बाजू मांडली. त्यांना कोर्ट पैरवी
अधिकारी ए. एस. आय. एन. ए. नलवडे व पो.
ना. वेणूनाद ढोपरे यांनी सहकार्य केले.
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test