सोमेश्वरनर ! पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा गुणवत्ता यादीत आदित्य ने पटकवले पाचवेस्थान.....
सोमेश्वरनगर-बारामती तालुक्यातील विद्या प्रतिष्ठानचे सोमेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज सी.बी.एस.ई वाघळवाडी येथील आदित्य दिपक पंडित या विद्यार्थ्याने पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत पाचवे स्थान पटकावले आहे. सदर गुणवत्ता यादी ही राज्यस्तरीय सी.बी.एस.ई व आय.सी.एस.ई शाळांतील विद्यार्थ्यांची असून ५० विद्यार्थ्यांपैकी आदित्य पाचव्या क्रमांकावर आला. या परीक्षेला शाळेमधून एकूण 29 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. शाळेतील शिक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनामुळेच हे यश शक्य झाले आहे अशी भावना आदित्यने
व्यक्त केली. शाळेचे प्राचार्य सचिन पाठक यांनी यशस्वी विद्यार्थी त्याच्या पालकांचे तसेच शिक्षकांचे अभिनंदन केले.