Type Here to Get Search Results !

वडगांव निंबाळकर को-हाळे खुर्द रस्त्यावर खोमणे वस्ती येथे पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे-सरपंच सुनिल ढोलेसदर मागणीचा विचार न झाल्यास ग्रामस्थांच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा.

वडगांव निंबाळकर को-हाळे खुर्द रस्त्यावर खोमणे वस्ती येथे  पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे-सरपंच सुनिल ढोले
सदर मागणीचा विचार न झाल्यास ग्रामस्थांच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा.

सोमेश्वरनगर- बारामती तालुक्यातील वडगांव निंबाळकर को-हाळे खुर्द रस्त्यावर खोमणे वस्ती येथे चारी वरील पुलाचे काम नुकतेच झाले आहे. सदर काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. रस्त्यापासून सुमारे ३ फुट खोल खड्ड्यात पूल झाला आहे यामुळे चारीतील प्रवाही पाण्याच्या मार्गाला अडथळा होणार आहे परिणामी परिसरातील चारीच्या कडेला राहणाऱ्या रहिवाश्यांच्या घरात पुलाच्या अडथळामुळे पाणी शिरू शकते काम सुरु होताना स्थानिक
रहिवाशी आणि ग्रामपंचायत प्रशासनाला विचारात घेतले नाही सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि ठेकेदार यांनी सोयिस्कर रित्या काम केले यामुळे काम निकृष्ट झाले आहे. सर्विस रोड काढला गेला नाही यामुळे महिनाभर नागरिकांची गैरसोय झाली. पुलाचा स्लब सुरु असताना त्यामध्ये दगडी भरली गेली. स्लब टाकल्यानंतर बाहेरून दगडी दिसत होती याचे फोटो उपलब्ध आहेत. सदर कामाचा दर्जा बाबत ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच सुनिल ढोले यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता उदय नांदखिले यांच्याकडे चौकशी केली असता सदर काम सगुणा कन्स्ट्रकशन करत असल्याचे सांगितले. कामासाठी नाबार्ड मधून ४६ लाख ५३ हजार रुपये निधी मिळाला आहे. निकृष्ट कामाबाबत कंत्राटदाराला विचारले असता अरेरावीची भाषा वापरली शाखा अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता उलट-सुलट उत्तरे देऊन दिशाभूल केली. अधिकारी आणि कंत्राटदार संगण मताने शासनाच्या निधीचा अपहार करीत आहेत. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून गावाला विकास निधी मोठ्या प्रमाणात येत
असतो परंतु अधिकारी आणि ठेकेदार संगण मताने निधीचा गैरवापर करत असल्याचा गावातील हा तिसरा प्रकार आहे. निरा डाव्या कालव्यावरील पुलाचे काम योग्य रीतीने झाले नाही एकूणच सर्वच पुलांच्या कामाची चौकशी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. संबधित कामाची चौकशी व्हावी. कामाचे बिल ठेकेदाराला अदा करण्यात येऊ नये पुलाचे काम परत पुन्हा उंच करण्यात यावे. अधिकारी ठेकेदार यांची ANTI-CORRUPTION चौकशी व्हावी अशी मागणी आमची आहे. मागणीचा विचार न झाल्यास ग्रामस्थांच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल.गावच्या विकासासाठी लोकप्रतिनिधींना पाठपुरावा करून गावामध्ये निधी मिळवला जातो तो निधी मिळाल्यानंतर त्या निधीचे वरिष्ठ कार्यालयामध्ये टेंडर केले जाते व टेंडर ज्याला मिळाले त्याने ते काम उत्कृष्ट दर्जाचे करावे अशी ग्रामपंचायत व ग्रामस्थांची इच्छा असते परंतु स्थानिक प्रशासन व स्वराज्य संस्था तसेच ग्रामस्थ यांना विचारात न घेता ते काम संबधित खात्याच्या अभियंता यांच्या संगण मतानेकाम केले जाते त्यासाठी स्थानिक प्रशासनाला व ग्रामस्थांना विचारात न घेता ते काम निकृष्ट दर्जाचे पूर्णकेले  जाते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test