Type Here to Get Search Results !

'सोमेश्वर' येथील किरण आळंदीकर यांची इंडिया बुलिअन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या (IBJA) पश्चिम महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी निवड ..

'सोमेश्वर' येथील किरण आळंदीकर यांची इंडिया बुलिअन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या (IBJA) पश्चिम महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी  निवड ..
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील करंजेपुल,सोमेश्वरनगर येथील पुनम ज्वेलर्स, के. एम. आळंदीकर सराफ पेढीचे प्रमुख आणि बारामती सराफ असोसिएशन चे अध्यक्ष किरण आळंदीकर यांची पदोन्नती होऊन इंडिया बुलिअन & ज्वेलर्स असोसिएशन ( IBJA ) च्या पश्चिम महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी आज निवड  झाली, राष्ट्रीय अध्यक्ष पृथ्वीराज कोठारी, उपाध्यक्ष चेतन मेहता राष्ट्रीय सचिव सुरेंद्र मेहता, महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष हरेश केवलरामानी, उत्तर भारताचे प्रमुख अनुराग रस्तोगी, मध्य भारताचे प्रमुख अविश सराफ,महाराष्ट्र राज्याचे मुख्य संचालक विजयकुमार लष्करे, आसाम चे अध्यक्ष प्रदीप सरकार, कनैय्या कक्कड यांच्या सह पदाधिकाऱ्यांची काल मुंबईत बैठक पार पडली.. यामध्ये कि रण आळंदीकर यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब होऊन आज राज्याचे अध्यक्ष हरेश केवलरामानी यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले.
किरण आळंदीकर यांनी या पूर्वी IBJA मध्ये, राज्य समन्वयक, संचालक या पदावर काम करीत असताना संपूर्ण राज्यात संघटना बांधणी केली आहे, इब्जा हि राष्ट्रीय संघटना 104 वर्षांपासून कार्यरत असून.. भारत सरकार आणि रिझर्व बँकेकडून इब्जा ने भारतातील जाहीर केलेले च सोन्याचे दर अधिकृत म्हणून ग्राह्य धरले जातात.
लवकर चं नवी मुंबई येथे सोने चांदी व्यावसायिक आणि कारागीर साठी इब्जा च्या वतीने 23 एकर जागेत सुमारे 50 हजार कोटी रुपये गुंतवणूक असलेला भव्य प्रकल्प उभारण्यात येणार असून,  या प्रकल्पा चा भव्य भूमिपूजन समारंभ मा. केंद्रीय मंत्री शरद पवार,राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेसह अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याची माहिती किरण आळंदीकर यांनी दिली.
आळंदीकर यांचे सराफ असोसिएशन सह विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test