Type Here to Get Search Results !

चौधरवाडी येथील 'एक गाव एक गणपती' व सामाजिक बांधिलकी जपणारा गणेशोत्सव


चौधरवाडी येथील 'एक गाव एक गणपती'  व सामाजिक बांधिलकी जपणारा गणेशोत्सव
सोमेश्वरनगर - गणेशोत्सवाची संकल्पना  लोकमान्य टिळकांनी एक समाज जागृती, एकजूट, संघटन या हेतूने  परंपरा सुरू केली त्याची जपवणूक करत गावातील तरुणांनी एकत्र येऊन ३५ वर्षा पूर्वी बारामती तील चौधरवाडी येथील शिवतेज मित्र मंडळाची स्थापना  आहे आणि एक गाव एक गणपती संकल्पना यांनी जपत एक सामाजिक बांधिलकी व समाज उपयोगी उपक्रम मंडळाच्या माध्यमातून राबवत आहेत त्यांचे खरंच कौतुक मंडळातील सर्व सदस्यां ने ही परंपरा जपणे काळाची गरज आहे .... भारतीय पत्रकार संघ बारामती तालुकाध्यक्ष विनोद गोलांडे यांच्याा शुभहस्ते  श्रीची आरती केली ....या वेळी श्री सोमेश्वर सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सुखदेव शिंदे ,सुरेशराव पवार  ,यादवराव शिंदे ,अनिल चौधरी नंदकुमार पवार ,विशाल पवार कांतीलाल शिंदे उपस्थित होते. तसेच 
गावातील ज्येष्ठांचा सन्मान राखत जनजागृती आणि लोकोपयोगी उपक्रम या मंडळातर्फे आयोजित करण्यात येतात. या वर्षी अध्यक्ष धिरज धनसिंग पवार,उपाध्यक्ष - किरण हनुमंत चौधरी,सचिव - दुशांत सुनिल चौधरी  यांच्या अध्यक्षतेखाली मंडळाचे सर्व पदाधिकारी सदस्य युवकांनी पुढाकार घेवून गणेशोस्तवाची तयारी केली. मुले आणि महिलांसाठी विविध स्पर्धा तसेच मनोरंजनाचे कार्यक्रम उस्तवाच्या कालावधी मध्ये लिंबु चमचा ,मडक फोडी,संगीत खुर्ची,रांगोळी स्पध्रेचे अयोजन केले होते  तसेच रतरी भजन कीर्तन अश्या कार्यक्रमाचे आयोजन हे मंडळ करीत असते. या साठी मंडळातील खजिनदार आदित्य जगताप ,सदस्य  प्रथमेश  पवार, अच्युत  पवार, प्रथमेश  शिंदे ,सुहास चौधरी सह मान्यवर ग्रामस्थ श्रम घेत असतात.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test