Type Here to Get Search Results !

सोमेश्वरनगर ! मु. सा. काकडे महाविद्यालयात १४ सप्टेंबर रोजी विशेष नवमतदार नोंदणी अभियान संपन्न.

सोमेश्वरनगर ! मु. सा. काकडे महाविद्यालयात १४ सप्टेंबर रोजी विशेष नवमतदार नोंदणी अभियान संपन्न.
 
सोमेश्वरनगर :बारामती तालुक्याती मु.सा. काकडे महाविद्यालयात पात्र नवमतदारांची नोंदणी करण्यासाठी विशेष नव मतदार नोंदणी अभियान यशस्वीपणे राबविण्यात आले.भारत निवडणूक आयोगाने ०१ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीच्या विशेष पुन:निरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. विशेष मतदार नोंदणी अभियानांतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बी. एल. ओ.) श्री. योगेश महाले, श्री. कदम एस. के.,  श्री. संतोष जाधव यांनी महाविद्यालयात भेट देऊन मतदार नोंदणी केली
भारतीय लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपणाला मतदानाचा घटनात्मक अधिकार दिला आहे. जिल्हाधिकारी पुणे,  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे, विद्यार्थी कल्याण मंडळ व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आपण सर्व विद्यार्थी जबाबदार सुजान नागरिक बनलेले आहात आपण ठरवाल ते सरकार निवडू शकता एवढी क्षमता मतदानामध्ये आहे असे प्रतिपादन मा. प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांनी केले.
याप्रसंगी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी श्री संतोष जाधव यांनी नव मतदार नाव नोंदणी करण्याची ऑनलाईन प्रक्रिया आवश्यक कागदपत्रे यांची माहिती दिली तसेच ऑनलाईन नाव नोंदणी करण्यासाठी श्री. कदम एस. के., श्री. योगेश महाले यांनी सविस्तर मार्गदर्शन केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समिती सदस्य उपप्राचार्य डॉ. जया कदम, डॉ. प्रवीण ताटे­देशमुख, डॉ. डी. आर. डुबल, प्रा.पोपट जाधव विद्यार्थी प्रतिनिधी श्री. जय भोपे , माधव ठोंबरे व राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. अच्युत शिंदे, प्रा. मेघा जगताप यांनी सहकार्य केले
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य प्रा. डॉ. जगन्नाथ साळवे यांनी केले, सूत्रसंचालन प्रा. डॉ. दत्तात्रय डुबल तर आभार प्रा. आदिनाथ लोंढे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test