Type Here to Get Search Results !

वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष "बारामती तालुका उपसमन्वयक" पदी सुशीलकुमार अडागळे यांची निवड.

वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष "बारामती तालुका उपसमन्वयक" पदी सुशीलकुमार अडागळे यांची निवड.
सोमेश्वरनगर - राज्याचे मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे, मा. खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, तसेच 
मंगेश नरसिंह चिवटे,मूळ संकल्पना तथा माजी कक्ष प्रमुख, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष, तथा विशेष कार्य अधिकारी, मुख्यमंत्री सचिवालय.यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सूचनेनुसार वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या "बारामती तालुका उपसमन्वयक" या पदासाठी सुशीलकुमार विलास अडागळे, (वडगांव निंबाळकर ,ता बारामती) यांची निवड करण्यात आली. दि. २ रोजी कन्हेरी ता बारामती येथे झालेल्या महाआरोग्य शिबीरादरम्यान हा निर्णय घेण्यात आला याप्रसंगी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष (महाराष्ट्र राज्य) कक्षप्रमुख,रामहरी भीमराव राऊत तसेच पुणे जिल्हा उपकक्ष प्रमुख नागेशजी जाधव, व सतिशजी गावडे यांच्या सह प्रमुख उपस्थिती   जिल्हा कक्ष प्रमुख अजय भाऊ सपकाळ, पुणे जिल्हा उपशहर प्रमुख डाबीसर, प्रसिद्धी प्रमुख जय होले, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख जितेंद्र सातव,छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा समन्वयक हेमंत पाटील, तसेच बारामती
तालुका समन्वयक मंगेशजी खताळ बारामती कक्ष प्रमुख कृष्णमूर्ती जगताप यांच्यासह तालुक्यातील सर्व महिला व पुरुष पदाधिकारी उपस्थित होते. 

शिवसेना वैद्यकीय मदतकक्षाच्या माध्यमातून आपण गोर गरीब गरजू आणि आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांना व निकषात बसत असलेल्या गरीब रुग्णांवर पूर्णतः मोफत किंवा सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया करण्यासंदर्भात मदत तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत नोंदणी असलेल्या रुग्णालयामध्ये गरजूंना शस्त्रक्रिया मोफत करणे यासाठी मी सदैव तत्पर राहिन तसेच गंभीर व महागड्या शस्त्रक्रिया करावयाच्या असलेल्या गोरगरीब रुग्णांना भरीव प्रमाणात अर्थसहाय्य व्हावे यासाठी मी कटिबद्ध असेन असे सुशिलकुमार अडागळे यांनी यावेळी सांगितले

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test