Type Here to Get Search Results !

अपघातात जखमी पोलिस हवालदार संदीप कदम यांचा उपचारादरम्यान निधन

अपघातात जखमी पोलिस हवालदार संदीप कदम यांचा उपचारादरम्यान निधन
बारामती - बारामतीतील भिगवण  रस्त्यावर झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या पोलिस हवालदार संदीप जगन्नाथ कदम रा. बारामती, मूळ रा. लासूर्णे, ता. इंदापूर यांचा सोमवारी दि. २५ रोजी  उपचारादरम्यान निधन झाले. हकीगत अशी की  शुक्रवारी दि. २२ रोजी सायंकाळी ते रोजच्या प्रमाणे व्यायामासाठी जात असताना  पाठीमागून आलेल्या तीन चाकी टेम्पोने त्यांना जोरदार धडक दिली होती. त्यात ते गंभीर जखमी झाले होते. डोक्याला मार लागल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक बनली होती.
उपचारासाठी त्यांना पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथून पुन्हा बारामतीला हलविण्यात आले होते. येथे उपचारा दरम्यान सोमवारी त्यांना मृत्यू आला. यवत पोलिस ठाण्याच्या अंतर्गत पाटस पोलिस चौकीत सध्या ते कार्यरत होते.हवालदार कदम यांची मृत्युची बातमी कळताच परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test