Type Here to Get Search Results !

सोमेश्वर कॉलेज परीसरात कोयत्याने दहशत करणाऱ्या आरोपीच्या वडगांव निंबाळकरपोलीसांनी आवळल्या मुसक्या

सोमेश्वर कॉलेज परीसरात कोयत्याने दहशत करणाऱ्या आरोपीच्या वडगांव निंबाळकर
पोलीसांनी आवळल्या मुसक्या
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील मु.सा. काकडे कॉलेज समोरील निरा बारामती रोडवर मिळालेल्या माहितीनुसार  तेजस उर्फ दादु विजय सवाणे वय २२ वर्षे, रा. वाघळवाडी ता.बारामती जि.पुणे हा हातात लोखंडी कोयता घेवुन मोठ मोठयाने आरडा ओरड करुन शालेय मुलांचे समोर दहशत निर्माण असल्याने त्यास पोलीसांनी ताब्यात घेवुन त्याचेकडुन लोखंडी कोयता हस्तगत करून वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशन गु.रजि. नं. ५७० / २०२३ भारतीय हत्यार कायदा कलम ४,२५ सह महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ चे कलम कलम ३७(२),३७ (३), सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम ११०,११२,११७ गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास सहा पोलीस उपनिरीक्षक डि.एस. वारूळे हे करीत आहेत.
सदरची कामगिरी ही अंकित गोयल सोो पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण, आनंद भोईटे अपर पोलीस अधिक्षक बारामती विभाग, पुणे ग्रामीण, गणेश इंगळे उपविभागीय पोलीस अधिकारी सोो बारामती उपविभाग, बारामती यांचे मार्गदर्शनाखाली वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सचिन काळे , सहा पोलीस निरीक्षक योगेश शेलार पोलीस उपनिरीक्षक, सहा पोलीस उपनिरीक्षक दिपक वारूळे, पोलीस हवालदार रमेश नागटीळक, अनिल खेडकर, अमोल भोसले, सागर देशमाने,अमोल भुजबळ, पोपट नाळे पोलीस मित्र अजित नलवडे यांनी केली आहे.

टिप :- अशा प्रकारे कोयत्याने दहशत माजविण्यांच्यावर व पसरवाणान्यावर पुणे ग्रामीण हद्दीत कडक कारवाई करण्यात येईल.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test