'सोमेश्वर' परिसरात गणपती बाप्पा मोरया...गणरायाचं उत्साहात आगमन...
सोमेश्वरनगर - गणेश चतुर्थी हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे जो १० दिवस चालतो. हा सण गणेशाच्या जन्मोत्सवाचा उत्सव म्हणून साजरा केला जातो, ज्याला हिंदू धर्मात विघ्नहर्ता आणि समृद्धीचे देवता मानले जाते.
गणपती बाप्पा मोरया..मंगलमूर्ती मोरया.. म्हणत ढोल-ताशांच्या गजरात आणि गुलालाची उधळणं करत लाडक्या गणरायाचं आगमन झालंय. राज्यभरात आपल्या लाडक्या बाप्पा घरी आणण्यासाठी गणेश चतुर्थी मंगळवार दि १९ रोजी भक्तांनी बारामती तील सोमेश्वरनगर येथील मुख्य करंजेपुल बाजारात गर्दी केलीय. तर गणेश मंडळाचे मोठे व लहान मंडळाचे छोटे गणपती रस्त्यावरून वाजत गाजत मंडळाच्या दिशेनं निघाले आहे.
घरोघरी बसणाऱ्या गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठापना मोठ्या उत्साहात करण्यात आली . गणेशमूर्ती सोबत बाप्पाच्या पूजेसाठी लागणारं साहित्य खरेदी करण्यासाठी चौधरवाडी, करंजे, मगरवाडी ,वाकी सोरटेवाडी, करंजेपूल ,वाघळवाडी परिसरातील नागरिकाची बाजारात गर्दी झालीये. विविध फुलांनी सजलेले पुष्पहार घेण्यासाठी फुल दुकानात गर्दी झालीये. तसंच गणपतीबाप्पाचे आवडते खास मोदक घेण्यासाठी मिठाईच्या दुकानात भक्तांनी गर्दी केलीय.