करंजेपुल येथील निरा डावा कालव्याचा पुल प्रवाश्यांना ठरतोय धोक्याचा
सोमेश्वरनगर - सर्वत्रच वडा, नाले, केनॉल च्या पुलाचे कामे चालू आहे, असे असताना काही ठिकाणी कामध्ये दिरंगाई तर काही जलद गतीने कामे चालू आहे ,बारामती तील करंजेपुल येथील निरा डावा कलव्याचा पुलाचे ही काम चालू आहे, हा पूल निरा-बारामती या रत्यावर आहे ,हा रस्ता नेहमी वाहतुकीच्या दृष्टीने वर्दळीचा ठरतो तर सर्वांसाठी महत्वाचा आहे, हे माहीत असून सुद्धा या कामाला दिरंगाई का?असा सवाल प्रवाश्यांन सह सामान्य नागरिकांना पडलेला आहे, हा पुल एका बाजूने चालू असून त्याच्या दोन्ही साईड चे पत्रे कोलंडलेल्या स्थितीत आहे,तर काही ठिकाणी पत्रे सुद्धा नाही संबंधित अधिकारी तेथे दिसत नाही ,चालू रस्त्यावर दोन ठिकाणी मोठे खड्डे तर एका साईडला तर रस्ता पूर्ण खचला आहे सध्या निरा डावा कालव्याचे पाणी चालू असल्याने एखादे वाहन यामध्ये जाण्याची शक्यता नाकारता येत नाही प्रवाश्यांना दुसरी गाडी आली तर येथे मोठ्या रांगा लागतात ,या रस्त्यावर अनेक छोटे मोठे अपघात झालें आहे याकडे संबंधित प्रशासनाने लक्ष देत लवकरात लवकर काम मार्गी लावावे असे मत सोमेश्वर परिसरातील नागरिकांनी आपले मत बोलताना व्यक्त केले आहे.