सोमेश्वरनगर ! उत्कर्ष उच्च माध्यमिक आश्रम शाळेच्या नंदा महानवरचा लांब उडी मध्ये प्रथम
पुणे येथील श्री शिव छत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी येथे पार पडलेल्या बालेवाडी,पुणे जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत उत्कर्ष उच्च माध्यमिक आश्रम शाळेच्या नंदा महानवर हिने लांब उडी मध्ये प्रथम क्रमांक यश मिळवला. १९ वर्षे वयोगटात नंदा महानवरने लांब उडीमध्ये हिने उंच उडीमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला. नंदाची निवड विभागीय मैदानी स्पर्धेसाठी झाली आहे. तिच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अजिंक्यदादा सावंत, विश्वस्त रोहिणी सावंत मुख्याध्यापक बाळू मोटे आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.